BULDHANAVidharbha

जन्मदिनी युवानेत्याला तरुणाईची अनोखी भेट; ‘रविकांत तुपकर युथ फाऊंडेशन’ची स्थापना!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकरी, शेतमजूर, कष्टकर्‍यांसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आंदोलनाच्या माध्यमातून लढा देणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेती अन् मातीशी कटिबद्ध असून गावगावड्यातील युवकांसह शहरी भागातील तरुणाईचे देखील आयकॉन ठरत आहेत. याच तरुणाईने रविकांत तुपकर युथ फाऊंडेशनची स्थापना करुन आपल्या नेत्याला जन्मदिनाची अनोखी भेट दिली आहे. १३ मे रोजी रविकांत तुपकर यांच्या हस्ते या फाऊंडेशनच्या लोगोचे अनावरण देखील करण्यात आले.

शेतकर्‍यांची मुलुखमैदानी तोफ म्हणून रविकांत तुपकरांची ओळख आहे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकर्‍यांसोबतच युवकांच्या प्रश्नांसाठीही तुपकरांनीही वारंवार लढा दिला आहे. त्यामुळे तरुणांची मोठी फौज तुपकरांच्या सोबत आहे. राजकारण बाजूला सारुन शेती आणि मातीसाठी काम करणार्‍या, समाजकारणाची आवड असलेल्या युवकांना सोबत घेऊन रविकांत तुपकर काम करतात. याच तरुणाईने रविकांत तुपकर युथ फाऊंडेशनची स्थापना केली आहे. ‘इन्स्पायरींग होप, एमपावरींग युथ’, हुंकार युवा शक्तीचा या ब्रिदवाक्याने हे फाउंडेशन काम करणार असून तरुण – तरुणी, विद्यार्थी यांच्या सर्वच प्रश्नांवर काम करणे, तरुणांचा व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी विविध संकल्पना राबविणे, राजकारण विरहीत समाजकारण करणार्‍या तरुणांना ताकद देणे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन काम करतांना तरुणांचे मोठे संघटन उभारण्याचा या फाउंडेशनचा मानस आहे. आजकाल वाढदिवस साजरे करण्याचे फॅडच झाले आहे. त्यातच नेत्यांचा वाढदिवस म्हटल्यावर शहरभर फ्लेक्स, पोस्टरबाजीला उधाण येते, मिरवणूक व इतर तामझाम पहावयास मिळतो परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे या सर्वाला अपवाद आहेत. १३ मे रोजी त्यांचा वाढदिवस झाला, पण नो इव्हेंट… नो तामझाम; ओन्ली काम असाच हा वाढदिवस दिसून आला. हा दिवसही नेहमी प्रमाणे त्यांनी कामात आणि भेटीगाठींमध्येच घालविला.

नित्यनेमाप्रमाणे सकाळी ते स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर, बुलढाणा येथे सकाळी आले, त्यानंतर पाहिले शिष्टमंडळ त्यांना भेटले ते परिवहन विभागात लागलेल्या पण अजून नियुक्ती न भेटलेल्या युवकांचे, त्यांचा प्रश्न रविकांत तुपकरांनी समजून घेतला व संबधीत वरिष्ठ अधिकार्‍याला तातडीने फोन लावला, त्यानंतरही काही लोक आपले कामे घेवून आले होते तर काही भेटण्यासाठी. आपल्या जीवाभावाचे कार्यकर्ते, वडीलधारी मंडळी आणि तरुणाईच्या भावनेचा अनादर करायचा नाही म्हणून रविकांत तुपकर सर्वांच्या शुभेच्छा स्विकारत होते. दिवसभर अगदी रात्री उशीरापर्यंत आलेल्या प्रत्येकाशी त्यांनी आपुलकीने संवाद साधला. आपल्यावर प्रेम करणार्‍या माणसांची गैरसोय होवू नये म्हणून सावलीसाठी रविकांत तुपकरांच्या ऑफिस समोर मंडप टाकलेला होता हाच एकमेक वाढदिवसाचा खर्च दिसून आला. मात्र, तसेही इतर कार्यक्रमाच्या वेळीही मंडप असतोच, अशा या नेत्याच्या नावाने युथ फाऊंडेशन स्थापन करुन तरुणाईने आपल्या नेत्याला जन्मदिनाची अनोखी भेटच दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!