AalandiPachhim Maharashtra

रक्तदान शिबिरात २०७ रक्तदात्यांचे रक्तदान उत्साहात

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्रद्धास्थान प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी शिबिरास परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात संप्पन झाले. या शिबिराचे आयोजन मोठ्या उत्साहात झाले. या सामाजिक, आरोग्यदायी उपक्रमात २०७ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे संयोजक राहुल चव्हाण यांनी सांगितले. शिबिरात २०७ रक्तदान, नेत्र तपासणी नंतर ९५ मोफत चष्मे वाटप, आरोग्य तपासणीत ७० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे हस्ते शिबिराचे दिपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले.

या शिबिरास आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, समाजरत्न नानजीभाई ठक्कर ठाणावाला, श्रीपादजी देशमुख, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, वि. का. सह. सोसायटी उपाध्यक्ष संभाजी धायरकर, उद्योजक मनोहर दिवाणे, भागवत काटकर, माजी नगरसेवक दिनेश घुले, संचालक ज्ञानेश्वर शामराव वहिले, दिगंबर तळेकर, मनसे शहराध्य्क्ष अजय तापकीर, हिरामण आल्हाट, सुरज राजळे, एचडीबी बँकेचे शशिकांत बाबर , संजय बोराटे, सतीश जरे, महिंद्रा कंपनी खजिनदार पवन जाधव, संग्राम पाटील, अजय पवार, परसराम धनवटे, साईनाथ ताम्हाणे, शशिकांत बाबर, हिरामण तळेकर, गोविंद पाटील, विनायक घिगे, मोरे काका , शाम गावडे, युवानेते रमेश वहिले, सचिन तळेकर नेते , हनुमंतशेठ चव्हाण, ज्ञानेश मंडले, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी चे फ्रेंड सर्कल आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणले, अत्यंत स्तुत्य उपक्रम होत आहे. रक्तदान हि काळाची गरज आहे. सर्व वयोगटातील लोकांनी रक्तदानास पुढे येणे आवश्यक आहे. आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणीत चष्मे वाटप करण्यात आले. रक्तदान केल्यास अनेक फायदे देखील होतात. आपली आरोग्य तपासणी होते. असेच अनेक सामाजिक उपक्रम राहुल चव्हाण यांनी आयोजित करावेत. यावेळी रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले. या शिबिराचे यशस्वीतेसाठी संयोजक सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण नेत्र तपासणी खुशांत त्रिवेदी, आरोग्य तपासणी साठी डॉ. भूषण जगताप, डॉ. सुहास गायकवाड, डॉ. योगेश चव्हाण, डॉ. अमित लिंबळे, डॉ.अक्षय शिनगारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!