मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक येथे छत्रपती संभाजीराजे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ छत्रपती संभाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून १०० ट्रॅक्टरची भव्य रॅली निघाली. ही रॅलीच मुख्य आकर्षण राहिली.
१०० ट्रॅक्टरची रॅली मेरा बुद्रुकमध्ये निघून प्रत्येक मंदिरावर जलाभिषेक करून छत्रपती संभाजीराजे यांच्या जयघोषाने मेरा बुद्रुक नगरी दुमदुमली. सकाळी दहा वाजता मिरवणुकीची समाप्ती झाली व सायंकाळी सहा वाजता जल्लोषात मेरा बुद्रुक नगरीतून छत्रपती संभाजी राजे यांची मिरवणूक निघाली. मिरवणुकीचे विशेष म्हणजे सर्व धर्मीयांनी या मिरवणूकमध्ये सहभाग नोंदविला. या मिरवणुकीमध्ये तरुणांसह वृद्धांनी स्वतः आपला सहभाग नोंदविला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पडघान, भरत पडघान, अमर पडघान, सागर पडघान, माजी सरपंच पती सुनील पडघान, मोहनराजे पडघान, गणेश वायाळ, गणेश पडघान, ज्ञानेश्वर पडघान व असंख्य तरुणांनी ह्या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला होता.
————-