ChikhaliVidharbha

कर्नाटक विजयाचा चिखलीत जल्लोष!

चिखली (तालुका प्रतिनिधी) – दिल्ली का झुठ आणि ४० टक्यांची लूट, या भ्रष्ट डब्बल इंजिनला हरवून कनार्टकच्या जनतेने धर्मांध, हुकूमशाही, वृत्तीला पूर्णतः नाकारून सर्वसमावेशक लोकशाही मानणार्‍या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला बहुमताने विजयी केले आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातही भाजपाचा सफाया होईल. राहुल गांधी यांच्या भारतजोडो यात्रेने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून, त्याचे प्रतिबिंब कनार्टकच्या विधानसभा निवडणुकीत दिसले आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले. कर्नाटक विजयाचा काल चिखलीत जोरदार जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

राहुल बोंद्रे म्हणाले, की कनार्टकच्या जनतेने भाजपाच्या भ्रष्ट सरकारला पराभूत करून कॉंग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. काँग्रेसने महागाई, बेरोजगारी, प्रचंड वाढलेला भ्रष्टचार या जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर निवडणुक लढवली. भारतीय जनता पक्षाने मात्र नेहमी प्रमाणे धार्मीक ध्रुवीकरण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत होते. परंतु कनार्टकच्या जनतेने त्यांचे मनसुबे धुळीस मिळवले. कनार्टक मधील जनता भाजपा सरकारच्या ४० टक्के कमिशन खोरीला कंटाळली होती. कोणत्याही भाजप नेत्यांनी कनार्टकच्या मुद्यावर निवडणूक न लढवता निवडणुकीला धार्मीक रंग देण्याचा प्रयत्न केला, पण कनार्टकच्या जनतेने तो हाणून पाडला. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा २१ दिवस कनार्टक राज्यात होती, ही यात्रा ५१ विधानसभा मतदार संघातुन गेली होती. यातील ३९ विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस उमेदवार विजयी झाले आहे. कन्याकुमारी ते श्रीनगर या ४ हजार कि.मी. च्या भारतजोडो यात्रेने देशातील राजकारण बदलले असुन या बदलांचे प्रतिबींब आजच्या निकालातुन दिसुन आले आहे, असेही राहुल बोंद्रे म्हणाले.

कनार्टक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव करत १३७ जागांवर विजयी आघाडी घेत बहुमत मिळवीले आहे. या विजयाचा जल्लोष चिखली शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साजरा केला. माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या गजरात मिठाई वाटत, फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी चिखली शहर अध्यक्ष अतहरोधीन काझी, डॉ.मोहमंद इसरार, कुणाल बोंद्रे, दिपक देशमाने, सचिन बोंद्रे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष रवि तोडकर, निलेश अंजनकर, किशोर कदम, रफिक सेठ, हाजी राउफ भाई, राजु रज्जाक, गोकुळ शिंगणे, विजय जागृत, क् भाई, खलील बागवान, ?ड. प्रशांत देशमुख, लिबाबापु देशमुख, गजानन परीहार, हानीफ बाबा, तृषार भावसार, सुरेंद्र ठाकुर, सुचित भराड, प्रदिप मोरे, डिगांबर देशमाने, अशोक पडघान, अजिम मिजवान, संजय गिरी, राजीक कुरेशी, नजिर कुरेशी, रहिमान भाई, आश्विन जाधव, साबीर भाई, चाँद खाँ, बबलु खरे, समद हाजी, अभय तायडे, अमिर बागवान, भास्कर चांदोरे, अप्पु खान, बबलु शेख, समिर शेख, शेख आजिम, आल्लु भाई, शेख रशिद, अबार बागवान, सावळे यांच्यासह असंख्य कार्यकर्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!