BULDHANAMEHAKARVidharbha

शासनाच्या सलोखा योजनेतून शेतकर्‍यांचा ‘सलोखा’!

बुलढाणा/मेहकर (बाळू वानखेडे) – शासनाची सलोखा योजना शेतकर्‍यांच्या फायद्याची ठरत असून, अतिशय अल्पनोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये एकमेकांच्या ताब्यात असलेली शेती स्वतःच्या नावावर अदलाबदल करून दिल्या जाते. या योजनेतील पहिल्या दस्तऐवज नोंदणीचा मान जानेफळ येथील शेतकरी संकेत प्रमोद डोमळे व रामदास गोपाळ ड़ोमळे यांना मिळाला आहे. याबाबतची अदलाबदल दस्तनोंदणी १२ मेरोजी मेहकर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आली.

वर्षानुवर्षे चालू असलेले शेतीचे वाद संपुष्टात यावे, व समाजामध्ये सलोखा राहावा, यासाठी शासनाने सलोखा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत बारा वर्षापासून एकाच्या नावावरील जमीन दुसर्‍याच्या ताब्यात असेल तर सामोपचाराने सदर जमीन एकमेकांच्या नावे अदलाबदल करून देण्यात येते. यामध्ये नोंदणी फी व मुद्रांक शुल्कमध्ये सवलत देण्यात येते. या योजनेंतर्गत मेहकर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात तालुक्यातील पहिली दस्तनोंदणी १२ मे रोजी जानेफळ येथील शेतकरी संकेत प्रमोद ड़ोमळे व रामदास गोपाळ ड़ोमळे यांची करण्यात आली. या दस्तनोंदीमध्ये साक्षीदार म्हणून प्रभारी तहसीलदार भूषण पाटील स्वतः हजर होते. दस्त नोंदणीवेळी प्रभारी तहसीलदार भूषण पाटील, दुय्यम निबंधक रमेश कांबळे, नायब तहसीलदार अजय पिंपरकर, मंड़ळ अधिकारी गणेश महाजन, जानेफळ भाग दोनचे तलाठी श्याम सोळंके, महसूल सहाय्यक रवी वाघ, दस्तलेखक सागर कानोड़जेसह इतर दस्तलेखक, ड़ाटा ऑपरेटर स्वप्नील कळासरे, हरिप्रसाद लोढे सह दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

सदर दस्तनोंदणीसाठीची कागदपत्रे नायब तहसीलदार अजय पिंपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली. यावेळी सदर शेतकर्‍यांचा सत्कार प्रभारी तहसीलदार भूषण पाटील, दुय्यम निबंधक रमेश कांबळे, नायब तहसीलदार अजय पिंपरकर यांनी केला. दरम्यान, अतिशय अल्पनोदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सदर दस्तनोंद होत असल्याने शेतकर्‍यांनी या सलोखा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी तहसीलदार भूषण पाटील व दुय्यम निबंधक रमेश कांबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!