– विजयानंतर शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांचा जल्लोष
– बाजार समितीनंतर खरेदी-विक्री संस्थेवरही खा. प्रतापराव जाधवांचेच वर्चस्व!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – मेहकर तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या ९ मे रोजी झालेल्या निवड़णुकीत शिवसेना शिंदे गटाने सर्वच्या सर्व १७ जागा जिंकल्या असून, महाविकास आघाडीची पार दाणादाण उडाली आहे. खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉ. संजय रायमुलकर यांची रणनीती कामी आली असून, यानिमित्ताने खरेदी-विक्री संघाचा प्रतापगड़ अभेद्यच असल्याचे दिसून आले.
मेहकर बाजार समितीच्या निवड़णुकीत खा.प्रतापराव जाधव व आ. ड़ॉ. संजय रायमुलकर यांना सत्ता राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती. तरीही प्रतापगड़ाला हादरले बसलेच. त्यामुळे खा. जाधव व आ. रायमुलकर यांनी खरेदी-विक्री संघाच्या निवड़णुकीत मोठी रणनीती आखत मतदारांपर्यंत व्यक्तिशः संपर्क केला. तर बूथ परिसरातदेखील दोघेही उशिरापर्यंत ठाण मांड़ून होते. त्यांच्या रणनीतीला यश आले असून, शिवसेना (शिंदे गट) प्रणित भूमिपूत्र पॅनलला सर्व १७ जागांवर एकहाती विजय मिळाला आहे. बाजार समिती निवड़णुकीत वङ्कामूठ आवळत सात जागा जिंकणार्या महाविकास आघाडीला मतदारांनी खरेदी-विक्री संघामध्ये मात्र साफ नाकारल्याचे दिसत असून, त्यांचा सुपडासाफ झाला आहे.
भूमिपूत्र पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये अनुसूचित जातीमधून जीवन त्र्यंबक वानखेड़े, महिला राखीवमधून कमल ड़िगांबर वानखेडे व कमल रमेश धोंड़गे, ओबीसीमधून कैलास नारायण बाजड़, वैयक्तिक मतदार संघातून प्रशांत शेषराव काळे, स्वप्नील भाष्कर घोड़े, मदन अण्णा चनखोरे, रवीकुमार लक्ष्मण आप्पा चुकेवार, दत्तात्रय लक्ष्मणराव टेकाळे, विजय रामचंद्र देशमुख, विनोद पांड़ुरंग देशमुख, शत्रुघ्न सूर्यभान निकस, दीपक प्रभाकर मगर, आत्माराम नवलाजी शेळके, मनोज मधुकर सावजी हे विजयी झाले आहेत. तर सुरेश वाळुकर व राजेंद्र वानखेडे यापूर्वीच अविरोध निवड़ून आलेले आहेत. शिवसेना शिंदे गटाचा एकतर्फी विजय झाल्याने शिवसेना कार्यालयासमोर शिवसैनिकांनी चांगलाच जल्लोष केला. यावेळी आ.संजय रायमुलकर यांनीही चांगलाच ठेका धरला होता.