BULDHANACrimeKhamgaon

मोबाईल रिचार्ज न केल्यामुळे घेतला वडिलांचा जीव; तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा

बुलढाणा (खास प्रतिनिधी) –  मोबाईलचा नादच खुळा आहे. डिजिटल इंडिया झाला असला तरी हा मोबाईल माणसाला कोणत्या थराला नेते याचे भीषण उदाहरण ठरलेली घटना नांदुरा शहरात मागील ७ वर्षांपूर्वी घडली होती. रिचार्ज का करून दिले नाही कारणातून दोघा मित्रांच्या मदतीने स्वत:च्या वडिलांची क्रूरहत्या करण्याच्या घटनेने जिल्हा हादरला होता. या तिन्ही नराधमांना खामगाव न्यायालयाने आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायाधीश ए. एस. वैरागडे यांनी हा जरब बसविणारा निकाल दिला. नांदुरा तालुक्यातील खडदगाव येथे २४ मे २०१६ रोजी सोनल विठ्ठल मानकर (२२), गणेश परमेश्वर पेसोडे (२२), वैभव जनार्दन लोणाग्रे यानी विठ्ठल मानकर (५५) यांची हत्या केली. मृतकाचा भाऊ रामकृष्ण मानकर यांच्या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलीसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम ३०२, ५०६, ३४ नुसार गुन्हा नोंदविला.तपासाअंती खामगाव न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. खामगाव येथील जिल्हा न्यायाधीश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश, ए.एस. वैरागडे यांनी १९ साक्षीदार तपासले. न्यायालयाने तिनही आरोपींना आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.  प्रत्येकाला दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तपास एपीआय एस.एस. आहेरकर यांनी केला तर सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील रजनी बावस्कार यांनी काम पाहिले. मोहरर जमादार बाळु डाबेराव यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!