ChikhaliVidharbha

डोंगरगावची झेडपी शाळा झाली वीज बिलमुक्त!

चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील डोंगरगांवचे सुपुत्र तथा जय ऋषी टेक्निकल अँड नॉन टेक्निकल कंपनीचे संचालक गणेशराव दांदडे यांनी १ मेरोजी महाराष्ट्र तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून व डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची गरज ओळखून या शाळेसाठी तब्बल दीड लाख रूपये किमतीचे सौरऊर्जा संच शाळेला भेट दिले आहे. त्यामुळे या शाळेची वीजबिलातून मुक्तता झाली असून, अशाप्रकारची ही जिल्ह्यातील पहिलीच शाळा ठरली आहे. दांदडे यांच्या दानशुरपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

गणेशराव दांदाडे यांच्या सहकार्यातून बुलढाणा जिल्ह्यातील पहिली शाळा ही सौरऊर्जेतून विजेची गरज भागविणारी तसेच मीटरमुक्त व बीलमुक्त शाळा झाली आहे. गणेश गुलाबराव दांदडे यांनी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा डोंगरगांव, पंचायत समिती चिखलीला दोन केव्हीचा सोलर संपूर्ण संच २४ वर्षांच्या वारंटीसह भेट दिला आहे. त्यामुळे शाळा मीटरमुक्त व बीलमुक्त होऊ शकली, त्यानिमित्त शाल, श्रीफळ देऊन मुख्याध्यापक सुरडकर सर यांनी गणेशराव दांदडे यांचे आभार व्यक्त केलेत. याप्रसंगी दानशूर दांदडे यांच्या वडिलांचे स्वागत जाधव सर यांनी केले. प्रमुख उपस्थितीमध्ये गावाचे सरपंच डिगांबर दांदडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची होती. याप्रसंगी या छोटेखानी कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. अनिता ज्ञानेश्वर दांदडे तसेच सर्व सदस्य यांनी सहकार्य केले. तर कार्यक्रमाचे संचलन शेख चाँद सर यांनी करून आभार गजानन आहेर सर यांनी मानले.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!