ChikhaliVidharbha

इसरूळ येथे संत चोखोबाराय मंदिराचा कलशारोहण सोहळा व पंचमूर्ती स्थापना

– आजपासून हरिनाम सप्ताहास हरिगजरात प्रारंभ
– हभप. न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांच्यासह नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा
– हभप. रामराव ढोक महाराज यांचे ज्ञानेश्वरी पारायण व श्रीराम कथा

चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील इसरूळ येथे संत चोखोबाराय या संतांचे पहिले मंदीर साकारले गेले असून, या मंदिराचा कलशारोहण सोहळा व पंचमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच हरिनाम सप्ताहाचे आजपासून आयोजन करण्यात आले आहे. हभप. न्यायाचार्य डॉ. नामदेवशास्त्री यांच्यासह राज्यातील नामवंत कीर्तनकार या सोहळ्यात कीर्तनपुष्प गुंफणार असून, रामायणाचार्य हभप. रामराव ढोकमहाराज यांचे ज्ञानेश्वरी पारायण व श्रीराम कथा होणार आहे. इसरूळ येथे तब्बल चार कोटी रुपये खर्च करून भव्य संत चोखोबाराय मंदिर उभारण्यात आले असून, श्री गुरू पाटणकरबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराची उभारणी झाली आहे. या मंदिराचा कलशारोहण सोहळा, व पंचमूर्ती स्थापना तसेच हरिनाम सप्ताहास आजपासून हरिगजरात प्रारंभ झाला आहे. मंदिरावर हभप शांतीब्रम्ह मारोतीबाबा कुरेकर यांच्याहस्ते १३ मेरोजी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार असून, कार्यक्रमाचे आयोजक हभप. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तसेच, तब्बल ४० हजार भाविकांना आमरसाच्या महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.

संत चोखोबाराय पुण्यतिथी महोत्सव, मंदिर कलशारोहण, अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व भव्य श्रीराम कथा या हरिनाम गजराने इसरूळ नगरी भक्तीरसात न्हाऊन निघत आहे. रामायणाचार्य हभप. ढोकमहाराज यांची श्रीराम कथा, याशिवाय आज (दि.५ मे) हभप. वेदांताचार्य अर्जुन गुरूजी लाड यांचे कीर्तन, दि. ६ मेरोजी हभप. संतवीर बंडातात्या कराडकर यांचे कीर्तन, ७ मेरोजी हभप. गुरूवर्य चैतन्यमहाराज देगलुरकर यांचे कीर्तन, ८ मेरोजी हभप रामकृष्णदास महाराज यांचे सकाळी तर हभप. भागवताचार्य जर्नाधन महाराज राजपूत यांचे कीर्तन, दि. ९ मेरोजी हभप. महंत रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे सकाळी तर हभप जयंत महाराज बोधले यांचे कीर्तन, दि. १० मेरोजी सकाळी चोखोबाराय निर्यानदिन हभप निवृत्ती महाराज कदम यांचे कीर्तन, तर हभप भागवताचार्य सोपान महाराजशास्त्री सानप यांचे कीर्तन, दि.११ मेरोजी हभप गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांचे सायंकाळी ७ ते ९ कीर्तन, दि.१२ मेरोजी हभप न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचे कीर्तन होणार असून, याच दिवशी सकाळी परमपूज्य श्री १००८ स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती यांचे संतपूजन होणार आहे. तर दि.१३ मेरोजी शनिवारी हभप. पुरूषोत्तम महाराज पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. दि. १३ मेरोजी हभप. गुरूवर्य शांतीब्रम्ह कुरेकरबाबा यांच्याहस्ते मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ४० हजार भाविकांना याप्रसंगी आमरसाचा महाप्रसाद वितरीत केला जाणार आहे, अशी माहिती इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर यांनी दिली आहे.

या शिवाय, दैनंदिन कार्यक्रमात सकाळी साडेचार ते सहा काकडा व प्रार्थना, सात वाजता आरती, १० वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा, दुपारी १२ ते १ भोजन, दुपारी २ ते ५ रामकथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री साडेआठ ते साडेदहा कीर्तन व नंतर हरिजागर होणार आहे. भक्ती आश्रम, इसरूळ (मंगरूळ फाटा) या ठिकाणी हा हरिनाम सप्ताह व कलशारोहण सोहळा पार पडत आहे.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!