Breaking newsBuldanaVidharbha

६५ लाखाची रोख घेवून जाणाऱ्या कार चालकास पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून शिताफीने पकडले

खामगाव (बुलडाणा) ६५ लाखाची रोख रक्कम भरधाव वेगाने कारने घेवून जाणाऱ्या कार चालकास पोलिसांनी सिने स्टाईलने पाठलाग करून खामगाव-नांदुरा मार्गावरील आमसरी जवळ पकडले. यावेळी कार चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या झटापटीत एक पोलीस अधिकारी व एक कर्मचारी गंभीर जखमी झाले. ही घटना ५ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे सदर रक्कम ही सोन्याच्या व्यवहारातील असल्याचा संशय आहे. चालकाने खामगाव अकोला येथे सोने विकल्याचे समजते.पकडलेली कार नाशिक येथील महिला पोलिस कर्मचारी यांची असल्याचे आरटीओ विभागात नोंद असून याबाबत एसपी दत्त यांना विचारले असता त्यांनी चौकशी सुर असून चौकशी अंती कार कोणाचे आहे हे समोर येईल.

 

 

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव अप्पर पोलीस अधिक्षक श्रवणदत्त यांना संशयीतरित्या कारने मोठी रक्कम घेवून जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरून अप्पर पोलीस अधिक्षक श्रवणदत्त यांच्या मार्गदर्शनाखाली एएसपी पथकाचे प्रमुख पिएसआय पंकज सपकाळे, रघुनाथ जाधव, गजानन बोरसे, संदीप टाकसाळ, गजानन आहेर, राम धामोळे यांनी ५ जुलै रोजी ५ वाजेच्या सुमारास टावर चौक भागात नाकाबंदी करून वाहनाची चौकशी सुरू केली. यावेळी गुप्त माहितीनुसार संशयीत कार क्र. एमएच ०५ सी ए ४७२१ येत असल्याचे दिसून आली. त्यामुळे पोलिसांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता कार चालकाने नापोकॉ यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जखमी करून पळ काढला. पुढे जलंब नाक्यावर सुध्दा पिएसआय सोळंके, जावेद शेख, जितेश हिवाळे, दिपक राठोड, प्रपुल्ल टेकाळे यांच्यासह पोलिसांनी गाडी अडविण्याचा प्रयत्न केला असता कार चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवित पोलिसांना चकमा दिला. खामगाव पोलिसांनी नांदुरा पोलिसांना याबाबतची माहिती देत दुसऱ्या गाडीने सिनेस्टाईल कारचा पाठलाग सुरू केला. यावेळी खामगाव व नांदुरा पोलिसांनी खामगाव नांदुरा मार्गावरील आमसरी फाट्याजवळ कारला पकडण्यात यशस्वी झाले. मात्र कार चालक हा कार पळविण्याच्या प्रयत्नातच होता. कार चालकास पकडतांना चालकाच्या बाजुचा काच फुटल्याने पीएसआय सपकाळे यांच्या हाताला काच लागून गंभीर जखमी झाले. पोलिसांनी आरोपीस पकडून कारची झाडाझडती घेतली असता कारच्या मागच्या सीटमध्ये एक कप्पा दिसून आला व त्यामध्ये ६५ लाखाची रोकड आढळून आली. पोलिसांनी पंचासमक्ष रक्कम जमा करून आरोपीस अटक केली. यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने त्याचे नाव मयुर मंगल नन्नवरे वय २८ रा.एरंडोल जळगाव खा. असे सांगितले यावेळी पोलिसांनी मोबाईल कार व रोख रकमेसह ७५ लाखाचा मुद्दमाल जप्त केला. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू होती.

 

 

सोन्याच्या व्यवहारातील रक्कम असल्याचा संशय

पोलिसांनी ६५ लाखाची रोकड घेवून जाणाऱ्या कार चालकास पकडले कार चालकाजवळून पकडलेली रक्कम ही अकोला,खामगाव व इतर ठिकाणी सोने विकून खामगाव वरून नेत होता. त्यामुळे सदर रक्कम ही सोन्याच्या व्यवहारातील असल्याचा संशय पोलिसांना असून याबाबत पोलिस तपास करीत आहे.

 

दोन पोलीस कर्मचारी जखमी

रक्कम घेवून जाणाऱ्या कार चा पाठलाग करत असतांना कार चालकाने नाकाबंदी करत असलेल्या नापोका गजानन आहेर यांच्या अंगावर कार घातली त्यामध्ये गजानन आहेर यांचा पाय फॅक्चर झाला. तर कार चालकास पकडल्यानंतर गाडीचा काच फूटल्याने पीएसआय पंकज सपकाळ यांच्या हाताला काच लागल्याने १५ टाके पडले आहेत.

 

पकडलेली कार नाशिक येथील महिला पोलिस कर्मचारी यांची असल्याचे आरटीओ विभागात नोंद

६५ लाख घेऊन जात असलेली कार ही खामगाव एएसपी पथकाने पकडली . पकडलेली संशयीत कार क्र. एमएच ०५ सी ए ४७२१ ही नाशिक येथील पोलिस कर्मचारी महिलेची असल्याचे आरटीओ विभागात नोंद आहे. याबाबत एसपी श्रवण दत्त यांना विचारले असता त्यांनी चौकशी सुरून असून चौकशी अंती  सर्व माहिती पडेल असे सांगितले

त्या कारमध्ये भूल भुलैया सारखी गुफा

पोलीस कर्मचाऱ्यासह इतरांची दिशाभूल करण्याकरिता तसेच रक्कम लपवून कारमधून नियमित रकमेची वाहतूक करण्यासाठी कारच्या पाठीमागील बसण्याच्या शिट च्या मध्यभागी गुफा सारखे बोगदे ( कप्पा ) बनवण्यात आले होते ती गुफा (कप्पा) थेट गाडीच्या पाठी मागच्या डिक्की मधून आर पार बनवण्यात आले होते उदाहरण पोलीस प्रशासनाने गाडी थांबवून बाहेरून डिक्की तपासली तर आत बसलेली व्यक्ती आत मध्ये बसूनच डिक्की मधली रक्कम आत मध्ये ओढुन घेईल म्हणजे डिक्की ची तपासणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला डिक्की मध्ये काहीही आढळणार नाही किंवा नंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी कारच्या आत मध्ये तपासणी केली असता सदरची रक्कम पुन्हा आत मधूनच डिक्की मध्ये टाकून पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी तसेच रक्कम वाचवण्यासाठी कारच्या पाठीमागे ही भुलभुलय्याप्रमाणे गुफा कप्पा बनवण्यात आली आहे हे विशेष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!