चिखली ग्रामीण (सुनील मोरे) – चिखली तालुक्यातील गुंजाळा या गावातील सर्वसामान्य अल्पभूधारक कुटुंबातील १९ वर्षीय मुलाने परिस्थितीशी संघर्ष करीत, इंडियन नेव्हीमध्ये पोलिस होण्याचा मान मिळविला, आणि ओडिसा येथे नुकतेच कठोर प्रशिक्षण पूर्ण करून घरी परताच ग्रामस्थांनी तसेच गरुडझेप अॅकॅडमीच्या शिक्षकांच्यावतीने त्याचा २६ एप्रिलरोजी भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
चिखली तालुक्यातील दीड ते दोन हजार लोकसंख्येचे गुंजाळा हे गाव आहे. या गावाच्या जमिनीचे क्षेत्र हे कोरडवाहू आणि डोंगराळ स्वरूपाचे असल्याने गावात नोकरी वर असणार्यांची संख्या फार कमी प्रमाणात असल्याने बेरोजगार तरुणांनाची संख्या जास्त आहे. त्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून तरुण विद्यार्थी परिश्रम घेत भारतीय सैन्य, आर्मी, पोलिस अशा विविध क्षेत्रांत भरारी घेत गावाचा नावलौकिक वाढवत आहे. त्यात आज अल्पभूधारक शेतकरी असलेले श्रीराम नानाभाऊ केदार यांचा मुलगा स्वप्निल उर्फ बाळू याचीही भर पडली आहे. स्वप्निल केदार याने ओडिसा येथे नुकतेच १५ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन घरी परतला, हे पाहून ग्रामस्थांनी तसेच छत्रपती संभाजीनगर येथील गरुडझेप अॅकॅडमी या संस्थेच्यावतीने भव्य नागरी सत्कार आयोजित केला होता. यावेळी मंचावर नानाभाऊ केदार, सत्कारमूर्ती स्वप्निल श्रीराम केदार, श्रीराम नानाभाऊ केदार, सौ. गंगाताई केदार, गजानन केदार, सौ. अश्विनी केदार, गरुडझेप अॅकॅडमीचे अध्यक्ष सुरेश सोनुने, नीलेश सोनुने, राजू केदार सर, साळवे सर, भगवान सानप, समाधान डोईफोडे, माजी सैनिक प्रकाश काळुसे, विष्णू सानप, शिवाजी ठाकणे, पत्रकार प्रताप मोरे, शिक्षक दीपक केदार, माजी सरपंच दीपक केदार, शिक्षक शिवाजी केदार, पोको गजानन वाघ, हभप सवडतकर, आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमप्रसंगी सत्कारमूर्ती स्वप्निल श्रीराम केदार याने आपले मनोगत व्यक्त केले की, मूळगावी गुंजाळा येथे पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी शिवाजी हायस्कूल मेरा बु., अकरावी ते बारावी शिक्षण वडिलांच्या मावशीकडे सिंगाव येथे पूर्ण करुन छत्रपती संभाजीनगर येथील गरूडझेप अॅकॅडमीमध्ये १५ महिन्याचे प्रशिक्षण घेत इंडियन नेव्हीची परीक्षा दिली, ती परीक्षा पास होवून निवड झाली. परंतु वजन ७५ किलो असल्याने धावणे होत नव्हते. त्यामुळे रात्रंदिवस सराव करून ७५ किलो असलेले वजन १५ किलो कमी केले. यासाठी गरुडझेप अॅकॅडमीच्या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, असे मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी उपसरपंच गजानन केदार परिवाराने आयोजित केलेल्या लावण्याचा कार्यक्रमाचा उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून आनंद साजरा केला.
कार्यक्रमाला गावातील विष्णू नागरे, रामप्रसाद केदार, योगेश थोरवे, नारायण मोरे, सिध्दार्थ गवई, बबन मोरे, सोनू इंगळे, राजू मोरे, बबन वाघमारे, सुनिल मोरे, संदीप केदार, दयानंद गवई, बंडू गवई, गजानन नागरे, बबन सावकार, आदी गावातील महिला पुरुष, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचाळ सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी केदार यांनी केले.
———-