– जातीय व धार्मिक सलोखा प्रस्थापित करण्यात अंढेरा पोलिस अग्रक्रमावर!
चिखली ग्रामीण (प्रतिनिधी) – प्रथमच अंढेरा पोलिस दलातर्पेâ मुस्लिम बांधवांसाठी १९ एप्रिलरोजी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. पोलिस स्टेशन मैदनात मुस्लिम बांधवांनी रोजा उपवास सोडत इफ्तार पार्टी मोठ्या उत्सवात पार पडली. जातीय व धार्मिक सलोखा प्रस्थापित करण्यात अंढेरा पोलिस अग्रक्रमावर असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील नावाजलेल्या अंढेरा पोलीस स्टेशन मध्ये ४८ गावांचा समावेश आहे, त्यामध्ये दहा ते पंधरा गावात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. पूर्वीपासून मुस्लीम समाज बांधवांसोबत इतर समाजाची मंडळी एकत्र येवून इप्तार पार्टी आपआपल्या गावामध्ये साजरी करतात. मात्र यावर्षी प्रथमच अंढेरा ठाणेदार गणेश हिवरकर यांनी आगळा वेगळा उपक्रम हाती घेवून पोलीस स्टेशनमध्ये इप्तार पार्टीचे आयोजन केले होते. या अनोख्या इप्तार पार्टीसाठी बुलढाणा जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीय अधिकारी सचिन कदम हे स्वतः हजर राहून त्यांनी उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांसह इतर जातधर्माच्या लोकांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा देत शांतता कायम राखून आणि एकता टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी मंचावर बुलढाणा पोलीस विभागाचे अधिकारी, ठाणेदार गणेश हिवरकर, दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे, जि.प.सदस्य अशोकराव पाटील, भगवानराव मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गजानन वायाळ, पंचायत समिती सदस्य सत्तार पटेल, मुकुंद दंडे, पत्रकार प्रताप मोरे, कैलास आंधळे, सुनिल अंभोरे, सुनिल मोरे, पीएसआय वाघ, सोनकांबळे राठोड, पोहेकॉ गवई, पोफळे, पवार, गिरी, जाधव, खार्डे, राठोड, पोलीस पाटील बद्री प्रसाद पाटील, संजय ठाकूर, दत्तू वायाळ, रोहडा, मणूबाई, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पाटील, बाबर देशमुख, फारुख देशमुख, अलियार सर, सिध्दार्थ गवई, विजयानंद मोरे, बबन मोरे, नारायण मोरे, बबन वाघमारे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.