BULDHANAHead linesVidharbha

जिल्ह्याच्या भूमिपुत्रांना ‘जिल्हा भूषण’ पुरस्कार घोषित

बुलढाणा (प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालणार्‍या विविध क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्त्वाची दखल घेऊन त्यांना ‘जिल्हा भूषण’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये बुलढाणा अर्बनचे सीईओ डॉक्टर सुकेश झंवर, अभिता लँड कंपनीचे प्रवर्तक तथा माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके, प्रशासकीय सेवेत आपला उत्कृष्ट ठसा उमटविणारे उपजिल्हाधिकारी ललित कुमार वराडे यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील मोठे नाव सुनील सपकाळ यांना जिल्हा भूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तरुणाई फाउंडेशनच्यावतीने हे पुरस्कार देऊळगाव माळी येथे दिले जाणार आहे.

बुलढाणा अर्बनचे रोप भाईजी उपाख्य राधेश्याम चांडक यांनी लावले. त्या संस्थेला जगमान्य करण्याचे काम डॉक्टर सुकेश झंवर अथकपणे करीत आहे. उत्कृष्ट मॅनेजमेंटमुळे बुलढाणा अर्बन जिल्ह्यातील, राज्यातील तरुणांसाठी रोजगाराचे मोठे माध्यम ठरले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था असा लौकिकदेखील संस्थेने प्राप्त केला, यात डॉक्टर झंवर यांचे उत्कृष्ट नियोजन आहे. ‘दयाभाव’ हा स्थायीभाव असणारे डॉक्टर झंवर नवोद्योजकांसाठी ‘आयडॉल’ ठरले आहेत.

प्रशासकीय सेवेत असताना सुनील शेळके यांनी उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून आपली छाप सोडली आहे. त्यांची राजर्षी शाहू पतसंस्था शिरपूरसारख्या छोटे खेडेगावातून महानगरापर्यंत पोहोचण्यात शेळके यांचे मार्गदर्शन मौलिक ठरले. दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून त्यांच्या पत्नी एडवोकेट जयश्रीताई शेळके यांनी जिल्ह्यात महिलांची फौज उभी केली आहे. अभिता लँड सोलुशनने राज्यस्तरावर कार्यारंभ केले आहे. वेगवेगळे उद्योग व्यवसाय उभे करून ते शिखरावर कसे न्यावेत, याचा आदर्श सुनील शेळके ठरले. तर उपजिल्हाधिकारी ललित कुमार वराडे हे प्रतिकूल परिस्थितीतून देऊळगाव माळीसारख्या छोट्या गावातून पुढे आले आहेत. परिस्थितीचा बाऊ न करता संघर्ष कसा करावा, याचा परिपाठ ललित कुमार वराडे यांनी दिला आहे. तसेच, विविध सामाजिक चळवळी सोबत जोडले जाणारे मोठे नाव म्हणजे सुनील सपकाळ. बुलढाण्यातील पुरोगामी सांस्कृतिक चेहरा म्हणून सपकाळ चीरपरिचित आहे.

बुलढाण्यात साजरी होणार्‍या सार्वजनिक शिवजयंतीची दखल संपूर्ण राज्यभर घेतली जाते. त्याची संकल्पना सपकाळ यांनी मांडली. तिला सर्व शिवप्रेमींनी तितकीच उत्कट दाद दिली आहे. सामाजिक कार्यात त्यांचे योगदान मोठे आहे. या सर्वांच्या कार्याची दखल घेत तरुणाई फाउंडेशनद्वारा देऊळगाव माळी येथे २५ एप्रिल रोजी सायंकाळी त्यांचा सन्मान केला जाणार आहे. प्रसंगी शेतकरी नेते रविकांत तुपकर, अप्पर पोलीस अधीक्षक बाबाराव महामुनी, पत्रकार गणेश निकम, निवृत्त अभियंता नारायण बळी आदींची उपस्थिती राहणार आहे. संचलन रणजीतसिंह राजपूत हे करणार आहे, असे आयोजक तथा तरुणाई फाऊंडेशनचे अध्यक्ष पत्रकार कैलास राऊत यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!