बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – सततच्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात रब्बीसह इतरही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये नुकसानीची धग खामगाव तालुक्यात सर्वात जास्त आहे. आज राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खामगाव तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. खचून जाऊ नका, सरकार आपल्या सोबत आहे, अशी ग्वाही देत नुकसानग्रस्त शेतकर्यांना त्यांनी धीर दिला.
जिल्ह्यात अवकाळी पाऊस थांबायचे नाव घेत नाही. खामगाव तालुक्यात तर पावसाने कहरच केला आहे. या पावसामुळे रब्बी पिके, कांदा, टोळकांदा, आंबा, फळबागा तसेच वीटभट्ट्यांचेही मोठे नुकसान झाले तर काही भागात जीवितहानीसुध्दा झाली. एकामागून एक संकट सुरूच असल्याने शेतकरी पूर्णतः खचला आहे. दरम्यान, काल ९ एप्रिल रोजीसुध्दा खामगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. आज, १० एप्रिलरोजी तालुक्यातील चितोड़ा, कारेगावसह आदि भागातील नुकसानीची कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली व खचून जावू नका, सरकार आपल्या सोबत आहे, शाश्वती देत नुकसानग्रस्त शेतकर्यांना धीर दिला. यावेळी खा. प्रतापराव जाधव, आ. अॅड़. आकाश फुंड़कर, माजी आ. राणा दिलीपकुमार सानंदा, प्रदेश सेवादलाचे तेजेंद्रसिह चव्हाण, प्रभारी एसड़ीओ अतुल पाटोळे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
————–