BULDHANAHead linesVidharbha

गणित पेपरफुटीचा जलदगतीने तपास; ठाणेदार काळे यांचा पोलिस अधीक्षकांच्याहस्ते सन्मान!

सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – राज्यभर गाजलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील इयत्ता बारावी गणिताचा पेपर फुटीप्रकरणी वेगवान तपास करून या गुन्ह्याचा छडा लावल्याप्रकरणी साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार नंदकिशोर काळे यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला आहे. या पेपरफुटीप्रकरणी विरोधी पक्षाने राज्य सरकारला विधीमंडळात धारेवर धरले होते. परंतु, ठाणेदार काळे यांनी तातडीने तपास करून दोनच दिवसांत आरोपी जेरबंद केले होते. त्यामुळे विधीमंडळात सरकारची अब्रू वाचली होती.

सविस्तर असे, की साखरखेर्डा पोलीस स्टेशन येथील ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी बारावी गणिताच्या पेपर फुटीला मदत करणार्‍यांचा शोध घेऊन अटक केल्या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गणित विषय सामूहिक कॉपीप्रकरणी साखरखेर्डा पोलीसांनी ३ मार्च रोजी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला होता. त्या सामूहिक कॉपीप्रकरणी मुख्य सूत्रधार अब्दुल अकील अब्दुल करीम याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलीसांना जास्त वेळ लागला नाही. या पेपरफुटी व कॉपी प्रकरणाचे बिंग कंडारी भंडारी येथील युवकांनी मीडियाला गणित विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल केल्यानंतर फुटले. उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, ठाणेदार नंदकिशोर काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल निवृत्ती पोफळे, सुरजसिंग इंगळे यांनी योग्य तपास करीत कंडारी भंडारी येथून तीन, किनगाव जट्टू येथील एकाला, शेंदुर्जन येथील दोन, लोणार येथील दोघांना अटक केली होती. १५ दिवसात तपास पूर्ण करुन सर्व आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!