AalandiHead linesPachhim MaharashtraPolitical NewsPolitics

माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, जयश्री पलांडे भाजपमध्ये दाखल!

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : भारतीय जनता पार्टीचा ४३ वा वर्धापन स्थापना दिवस आळंदी परिसरात उत्साहात विविध उपक्रमांनी भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला. पुणे जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख डॉ. राम गावडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी उपाध्यक्ष जयश्री पलांडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी भारतीय जनता पक्षात केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिरूर लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांतील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

भाजपचे ज्येष्ठ नेते सुदाम मोरे काका यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी आळंदी शहराध्यक्ष किरण येळवंडे, आध्यात्मिक आघाडीचे हभप संजय महाराज घुंडरे, भाजपचे नेते डॉ.राम गावडे, माजी नगरसेवक सागर भोसले, पांडुरंग वहीले, सचिन काळे, कार्याध्यक्ष बंडुनाना काळे, प्रमोद बाफना, अमोल विरकर, आकाश जोशी, माऊली बनसोडे, उद्योजक नाना झोंबाडे, चारुदत्त प्रसादे, संदीप पगडे, भागवत काटकर, संकेत वाघमारे, मंगल हुंडारे, संगिता फफाळ तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे स्वागत सत्कार करून कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी भाजपचे नेते डॉ.राम गावडे, आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख संजय घुंडरे,मंगला हुंडारे यांनी मनोगते व्यक्त करीत मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांनी पक्ष संसंघटनेच्या कार्याचा वाटचालीचा आढावा घेतला. या प्रसंगी डॉ.राम गावडे म्हणाले, भाजपची कार्यपद्धती ही कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून विकासात्मक आहे. भाजप हा इतर पक्षानं पेक्षा वेगळा आहे. यामुळेच भाजपात आपण प्रवेश केल्याचे सांगितले.

पुणे जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख डॉ. राम गावडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी उपाध्यक्ष जयश्री पलांडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी भारतीय जनता पक्षात केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिरूर लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांतील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी भाजपच्या मुंबई मुख्यालयात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, माजी महापौर व सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आशाताई बुचके, माजी तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, उद्योजक सुरेश नाना झोंबाडे, विष्णू कुऱ्हाडे, युवानेते मनोज मराठे, अमोल वीरकर, संजय घुंडरे, पांडुरंग ठाकुर, भागवत आवटे, शहराध्यक्ष किरण येळवंडे, आकाश जोशी, संकेत वाघमारे, माऊली बनसोडे आदी उपस्थित होते.

या भाजप प्रवेशात शिरूर आणि बारामती लोकसभा मतदार संघातील अनेक शिवसेनेचे शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख वर काम केलेले पदाधिकारी यांचा भाजपात प्रवेश झाला. पुणे जिल्हा माजी अध्यक्ष डॉ. राम गावडे यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी तसेच परिसराचा विकास व्हावा यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगत शिवसेना सोडत असताना भाजप प्रवेशात त्यांचे मनोगत व्यक्त करताना डोळ्यांचे कडा पानावहल्या. यावेळी माऊलींची मूर्ती आणि तुळशीहार देऊन प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!