सिंदखेडराजा/मेहकर (सचिन खंडारे) – मेहकर तालुक्यातील वरदडी नांद्रा येथे आयोजित भव्य धम्म मेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते भाई कैलास सुखधाने तर उद्घाटक म्हणून लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेलचे जिल्हा प्रतिनिधी गजेंद्र गवई होते. तर मंचावर भंदन्त महाथेरो महिंद्र बोधी, भदन्त बुद्धपुत्र, घोंगडे सर, बाबुराव खिल्लारे, ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर गंगाराम उबाळे, मलकापूर पांगरा येथील युवा सेनेचे अमोल देशमुख बापू, चिखली तालुका अध्यक्ष ज्ञानदेव वायाळ, रावसाहेब वायाळ जिल्हा उपाध्यक्ष, शिवाजी सुखदाने, बारकू कंकाळ, पल्लवी वैराळ सरपंच, भालेराव ग्रामसेवक, भूषण गवई, सुरेश सरकटे, साहेबराव गवई, ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती जिल्हा उपाध्यक्ष बबन सरकटे, गावचे पोलीस पाटील सुखदाने आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम दोन्हीही भन्तेजी यांचे फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले, त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्याहस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर त्रिसरण पंचशीला ग्रहण करण्यात आले व भदंन्त बुद्धपुत्र यांनी उपस्थित उपासक-उपासिका यांना धम्मदेशना दिली. त्यानंतर घोंगडे सर यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक गजेंद्र गवई यांनी आपल्या मनोगत सांगितले की, सम्यक संकल्प प्रत्येकाने पूर्ण केले पाहिजे. जो समाज एकत्र येतो तो समाज प्रगतीच्या वाटा शोधत असतो. धम्म म्हणजे काय हे प्रत्येकाने अगोदर समजावून घेतले पाहिजे. येणारा काळ हा भयानक असून शैक्षणिक धोरण बदललेले आहे, आणि यासाठीच प्रत्येकाने जागृत रहावे. बुद्ध विहार असेल या ठिकाणी रोज त्रिसरण पंचशील ग्रहण केल्या गेले पाहिजे, असे विचार यावेळी गजेंद्र गवई यांनी मांडले. त्यानंतर अध्यक्षीय भाषणातून कैलास सुखदाने यांनी सांगितले की, तथागत भगवान गौतम बुद्धाने जो धम्म दिला त्या धम्माच्या मार्गाने आपण सर्वजण चालले पाहिजे. कुठेही अन्याय, अत्याचार झाले तर निश्चितच आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून मी आतापर्यंत पाठीशी उभा राहिल. संपूर्ण जग हे बुद्धमय होत असून विदेशातही तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती भेट म्हणून दिल्या जाते, असे विचार यावेळी भाई कैलास सुखधाने यांनी मांडले.
गावामध्ये बुद्ध मूर्ती आल्यानंतर बुद्धमूर्ती बसू नाही यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी अनेक खेड्यापाड्यातून महिला उपासिका संघसुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. यामध्ये बारई, देळगाव माळी, वडगाव माळी, सावंगीवीर, नेमतापूर, नांद्रा धांडे येथील उपासिका संघांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सचिन खंडारे यांनी तर आभार प्रदर्शन युवा साहित्यिक विकास सुखदाने यांनी केले. कार्यक्रमानंतर गावकर्यांच्या वतीने खीर व पुरीचे भोजन देण्यात आले. कार्यक्रमासाठी विश्वरत्न महिला संघ नांद्रा, प्रज्ञाशील महिला करुणा संघ नांद्रा, विश्वरत्न मित्र मंडळ नांद्रा, संभाजी ब्रिगेड नांद्रा, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मित्र मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.