AalandiBULDHANACrimeHead linesVidharbha

खळबळजनक! पतीने आवळला पत्नीचा गळा!

– शाळेतून आलेल्या मुलाला रस्त्यावर घेण्यास का गेली? या कारणावरून पतीने केला पत्नीचा खून

बुलढाणा (स्पेशल टीम) – शाळेतून आलेल्या मुलाला रस्त्यावर घेण्यासाठी का गेलीस? या कारणावरुन पत्नीसोबत वाद घालत पतीने गळा आवळून खून केला. ही घटना ३ एप्रिलरोजी देऊळगावराजा येथे घडली. याप्रकरणात आधी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर आरोपी पतीविरुद्ध ५ एप्रिलरोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा शहरातील शिवाजी पार्क भागातील रहिवासी सुनील भास्कर गिते (वय ३५) याने ३ एप्रिलरोजी त्याची पत्नी शिवकन्या सुनील गिते (वय २५) हिचे सोबत सकाळी १०.३० वाजता शाळेतून येणार्‍या मुलाला आणायला रस्त्यावर का गेली, या कारणावरुन वाद घातला. दरम्यान, त्याने शिवकन्या गिते हिचा गळा आवळून खून केला. याप्रकरणात पोलिसांनी आधी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून तपास सुरु केला होता. याप्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन संशयित आरोपी पतीचा जवाब नोंदविला होता. मात्र शवविच्छेदन अहवाल येणे बाकी होते.

दरम्यान, ५ एप्रिल २०२३ रोजी शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच शिवकन्या गिते हिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी सुनील गिते यांनी खुनाची कबुली दिली. आरोपी सुनील गिते यास अटक करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे हे करीत आहेत.

——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!