बुलढाणा (खास प्रतिनिधी) – जंगलव्याप्त जिल्ह्यात चंदन तस्करी होत आहे. तत्पूर्वी शासकीय कार्यालयातून चंदनाची झाडे कापून नेण्यात आल्याचे उघड झाले होते. दरम्यान एलसीबीच्या पथकाने चंदन चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या पुष्पाला आज नांदुऱ्यातून अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक सारंग आवाड ,अपर पोलीस अधीक्षक महामुनी यांचे आदेशानुसार तसेच पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे मार्गदर्शनाखाली कलम ३७९,३४ भा द वी गुन्हामधील चंदन चोरीमध्ये पाहिजे असलेला आरोपी विनोद मोहन इंगळे (५०) रा. बोराळा ता. चिखली, जि. बुलढाणा यास ताब्यात घेऊन नांदुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई स फौ गजानन माळी,नापोका दिगंबर कपाटे,चापोका राहुल बोर्डे यांनी केली.