कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; १८ जागासाठी विक्रमी २३१ उमेदवारी अर्ज!
कर्जत (प्रतिनिधी) – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसानंतर २३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस डी सूर्यवंशी यांनी दिली. शुक्रवारपर्यत सर्व जगासाठी अवघे ७८ अर्ज दाखल झालेले होते. मात्र आज शेवटच्या ऐका दिवसात १५३ अर्ज दाखल झाले. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक जाहीर झाली असून आज दि ३ एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. आज दुपारी मुदत संपल्या नंतर १८ जागासाठी होणार्या या निवडणुकीत ऐकून २३१ अर्ज दाखल झाले आहेत.
सोसायटी मतदार संघातील ११ जागा साठी एकुन १२४ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वसाधारण ७ जागासाठी जगताप मंगेश रावसाहेब, यादव निलेश शहाजी, पवार विजय भागवत, कळसकर सतिष भैरवनाथ, पावणे भरत संभाजी, घालमे तात्याभाऊ निवृत्ती, पाटील अभय पांडूरंग, पाटील संग्राम रावसाहेब, जगदाळे भागवत अशोक, गायकवाड भिमराव जगन्नाथ, तनपुरे युवराज विनायकराव, सुद्रिक लालासाहेब काशिनाथ, घालमे मधुकर बाबूराव, घालमे बाळासाहेब शिवाजीराव, गोडसे मोहन दामोदर, पाटील नितीन निळकंठ, सुर्यवंशी रामदास निवृत्ती, भोसले रामचंद्र दिगांबर, गांगर्डे हौसराव आंबू, खेतमाळस रमेश बाबूराव, तनपुरे गुलाबराव रामचंद्र, लिंगडे अमृत विश्वनाथ, खराडे संपत राजाराम, निंबाळकर रोहित अशोकराव, भोसले श्रीकांत चंद्रकांत, थोरात चमस एकनाथ, काळे महेश दादा, खोसे भाऊसाहेब शिवराम, खेडकर मनोज कल्याणराव, खेडकर मोहन गणपत, मोरे महादेव दत्तू, शिंदे विश्वास जयवंतराव, रोकडे दादासाहेब महादेव, दवणे सचिन मच्छिंद्र, काळदाते आशिष बापूसाहेब, लाघुडे सतिष दत्तात्रय, मांडगे रामदास झुंबर, अनभुले दादासाहेब एकनाथ, भोसले संतोष बन्यासाहेब, पाटील अमोल शिवाजी, तापकीर काकासाहेब लक्ष्मण, गायकवाड बिभिषण महादेव, भांडवलकर राजेंद्र ज्ञानदेव, बोरूडे अभंग रूपचंद, शिंदे प्रकाश काकासाहेब, सुद्रिक सतिष महादेव, भगत बाळासाहेब भाऊसाहेब, लाढाणे अशोक सुखदेव, मासाळ शांतीलाल नारायण, गांगर्डे शरद चंद्रभान, अडसुळ दिलीप दिनकर, नवले नंदराम मारूती, मुळीक सुखदेव विठ्ठल, शिंदे सुहास सुभाष, बावडकर वंदनकुमार सर्जेराव, कानगुडे दादासाहेब आश्रू, धुमाळ संतोष बाबाजी, गलांडे दत्तात्रय रामचंद्र, तोरडमल भाऊसाहेब दिगांबर पुराणे दिगंबर बाबासाहेब, सपकाळ बाळासाहेब माधवराव, बोरूडे माणिक भानुदास, अनभुले योगेश रामभाऊ, पवार नरसिंग श्रीधर, शिंदे भैरवनाथ पंढरीनाथ, भिसे जितेंद्र निवृत्ती, फाळके पप्पू उत्तम, फाळके अजितसिंह शहाजीराव, थेटे जयसिंग लालासाहेब, माने संतोष पोपट, ढगे अशोक बाजीराव, शेळके नंदकुमार विश्वासराव, निकत राजेंद्र प्रतापराव, गोरे गिताराम भानुदास, गायकवाड शेखर महादेव ७५ अर्ज आले आहेत.
महिला राखीव २ जागांसाठी शेळके यशांजली श्रीमंत, कळसकर सुवर्णा सतिष, निंबाळकर मंजुळा संतोष, सुद्रिक कमल गणपत भिसे मनिषा सुरेश, पवार जया विजय, गांगर्डे विजया कुंडलिक, शेळके यशांजली श्रीमंत, थेटे अरूणा जयसिंग, भंडारे शोभा पोपट, साळवे शांताबाई दत्तू, बोराटे सोनाली संदिप, जामदार लिलावती बळवंत, सपकाळ विजया बाळासाहेब, घालमे अनिता बाळासाहेब, कापरे सुनिता रामदास, शेळके संगिता बाळासाहेब असे एकूण १७ अर्ज दाखल झाले आहेत, इतर मागास वर्ग प्रवर्गाच्या १ जागेसाठी कळसकर सतिष भैरवनाथ, अनारसे रमेश साहेबराव, नवले नंदराम मारूती, गोडसे मोहन दामोदर, पाटील नितीन निळकंठ, शेवाळे श्रीहर्ष कैलासराव, खेतमाळस रमेश बाबूराव, खेडकर मोहन गणपत, घालमे मधुकर बाबूराव, खोसे भाऊसाहेब शिवराम, गायकवाड बिभिषण महादेव, बोरूडे अभंग रूपचंद, कोपनर किशोर भाऊसाहेब, ननवरे दिपक मोहन, बनकर रमेश हरिभाऊ, कानगुडे दादासाहेब आश्रू, सायकर ज्ञानेश्वर प्रभाकर, गोरे गिताराम भानुदास आदीचे १८ अर्ज दाखल झाले आहेत. भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या १ जागेसाठी वतारे लहू रामभाऊ, पावणे विजय शिवराम, गावडे भाऊसाहेब सोपान, भिसे सुरेश भानुदास, काळे बारकू बळी, खामगळ कोंडीभाऊ भागुजी, व्हरकटे रमेश जयवंत, महारनवर आण्णासाहेब महादा, पावणे भरत संभाजी, मासाळ शांतीलाल नारायण, गलांडे दत्तात्रय रामचंद्र, भिसे जितेंद्र निवृत्ती, वतारे लोचना अंकुश, कोपनर किशोर भाऊसाहेब आदी १४ अर्ज दाखल झाले आहेत.
याशिवाय ग्राम पंचायत मतदार संघासाठी ४ जागासाठी ७७ अर्ज दाखल झाले आहेत, यामध्ये सर्वसाधारण २ जागासाठी बोरुडे संभाजी रोहिदास, पावणे किरण उत्तम, नवले नंदराम मारुती, मोढळे सुरेश माणिक, पवार रोहिणी अशोक, निकत विलास भिवा, घालमे मधुकर बाबुराव, धुमाळ पोपट दिगांबर, यादव बळीराम मारुती, पोटरे प्राजक्ता विजय, भांबे जयश्री दिपक, कोळेकर दादा अंकुश, धांडे बापु गणपत, खेडकर मनोज कल्याणराव, व्हरकटे रमेश जयवंता, दरेकर ज्योति सतिष, महारनवर देवास सुर्यभान, कानगुडे राम प्रभाकर, खराडे अनिल अशोक, थेटे जयसिंग लालासाहेब, पांडुळे केतन कांतीलाल, भंडारे पांडुरंग लक्ष्मण, कोरडे रजनी चंद्रकांत, बोराटे वासुदेव विनायक, तापकीर प्रविण धनराज, काळे ज्योतिराम रायचंद, भिसे लहु नरहरी, धुमाळ संत्ाोष बाबाजी, अनभुले तान्हाजी बाळासाहेब, काळे विकास भाऊसाहेब, शेळके युवराज हनुमंत, सायकर ज्ञानेश्वर प्रभाकर, मोरे राजेंद्र गणपत, पाटील माधुरी दत्तात्रय, शेळके कृष्णा एकनाथ, नवसरे हनुमंत भरत, मोढळे स्वप्निल विकास, लाळगे सचिन भाऊसाहेब, पिसाळ दत्तात्रय दादासाहेब, घनवट रणजित नागेश, मोरे महेश कांतीलाल, राजेभोसले युवराज बाबाजी, भिसे नवनाथ भागवत, दरेकर सतिष सुभाष, परदेशी गंगासिंग अंबरसिंग, भोसले योगिता अमोल, भोसले नंदा प्रकाश आदी ४७ अर्ज दाखल झाले आहेत.
अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या १ जागेसाठी कांबळे वसंत विठठल, बुध्दीवंत प्रशांत रमेश, आडसुळ सोनबा नाना, शिंदे सुरेश बाबुराव, मोरे बंडा बबन, माने संतोष यमाजी, गोरखे ऋषिकेश सुरेश, लोंढे बाळासाहेब विश्वनाथ, जगधने पुजा नितीन, चव्हाण सचिन गौतम, तांबे देवराव भाऊराव, साळवे शांताबाई बापु, वाघमारे राणी सचिण, शिंदे सुरेश बाबुराव, मांढरे श्रीकांत आनंदा, खुडे नवनाथ धर्मा आदी १६ अर्ज दाखल झाले आहेत. दुर्बल घटक प्रवर्गाच्या एक जागेसाठी पावणे किरण उत्तम, धुमाळ पोपट दिगांबर, लाळगे सचिन भाऊसाहेब, बाबर हरीभाऊ रघुनाथ, पाटील अमोल शिवाजी, नवसरे हनुमंत भरत, बोरुडे संभाजी रोहिदास, मोढळे सुरेश माणिक, थोरात बाळु दिगांबर, शेळके कृष्णा एकनाथ, भोसले रामचंद्र डिगांबर, राजेभोसले युवराज बाबाजी, भोसले हनुमंत प्रकाश, भोसले नंदा प्रकाश आदी १४ अर्ज दाखल झाले आहेत.
आडते व्यापारीच्या २ जागासाठी नेटके विजय धनराज, सुपेकर अशोक राधाकिसन, भंडारी अनिल शोभाचंद, पितळे चनसुख बन्सीलाल, नेवसे प्रफुल्ल पंढरीनाथ, भंडारी विजय चंपालाल, बावडकर पांडुरंग नामदेव, देसाई स्वप्निल पोपटलाल, कोठारी रविंद्र लिलाचंद, भंडारी वैभव विजय, काळे कल्याण भिमराव, बाबर बाळासाहेब बुधाजी, जेवरे महेश सुर्यकांत, नेवसे प्रफुल्ल पंढरीनाथ, भंडारी विजय चंपालाल, पवार राहुल भारत, सुपेकर किरण राधाकिसन, बेंद्रे संभाजी नानाभाऊ आदी १८ अर्ज दाखल झाले आहेत. हमाल मापाडीच्या १ जागेसाठी बाफना महाविर अंबरचंद, मोहिते सुरेश बबन, काळंगे जालिंदर रमेश, शेलास प्रकास बाळासाहेब, मते बाबासाहेब रोहिदास, कोल्हे संजय वसंत, गोलांडे गोदड गणपत, नेटके बापुसाहेब प्रभाकर, गोंजारे सुरेश बापु, लाहोर गेनदेव छंदार, सावंत भाऊसाहेब शहाजी, भिसे चंदन अशोक आदी १२ अर्ज दाखल झाले आहेत.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहा. निबंधक एस डी सुर्यवंशी हे काम पाहत आहेत, तर सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तान्हाजी टेकाळे काम पाहत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील संचालकापैकी उप सभापती प्रकाश शिंदे, यांचे सह बळीराम यादव, श्रीहर्ष शेवाळे, महेश काळे, श्रीकांत भोसले, वसंत कांबळे, लहू वतारे, प्रफ्फुल नेवसे, संजय कोल्हे, यांनी पुन्हा अर्ज दाखल केले आहेत तर इतरांनी या निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतल्याचे पहावयास मिळत आहे.
उमेदवार संख्या वाढल्याने कोणाची वाढणार धडधड?
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत समोरासमोर एकास एक अशी लढत होईल अशी चर्चा होती. आ. रोहित पवार व आ. प्रा. राम शिंदे यांचे दोन पॅनल होतील अशी चर्चा होती मात्र तिसरे पॅनल ही उभे राहण्या बाबत दबक्या आवाजात चर्चा होती. यामागे नेमकी कोणती शक्ती कशी कार्यरत आहे याचे किस्से मागील अनेक निवडणुकांचे संदर्भ देत रंगवून सांगितले जात होते. कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने विविध शक्यताना बळ मिळत असले तरी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोणकोणत्या व कशा बैठका होतात व नेमके किती उमेदवार शिल्लक राहतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भाजपाचे विखे समर्थक समजले जाणारे सहकार बँकेचे संचालक अंबादास पिसाळ हे सद्या भाजपा पासून अंतर ठेऊन असल्याचे पहावयास मिळत असून यामुळे भाजपाच्या गोटात खळबळ असून ते तिसरी आघाडी उभारू शकतात या चर्चानी वेग घेतला असला तरी विखे पिता पुत्र पिसाळ यांना वेगळी भूमिका घेऊ देणार नाहीत अशी ही चर्चा रंगत आहे. मात्र अर्ज माघारी घेई पर्यत सर्व प्रकारच्या उलट सुलट चर्चा होतच राहणार आहेत. त्यामुळे कोण कोणाच्या पॅनल मधून उभे राहणार याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.