– मराठा मेळाव्याला आले लोकचळवळीचे स्वरूप!
बुलढाणा (गणेश निकम) – बुलढाणा शहरातील गर्दे सभागृह काल गर्दीने ओसांडून वाहिले. मराठा वधू-वर परिचय मेळाव्यास मिळालेला अभुतपूर्व प्रतिसाद पाहता, मेळावा लोकचळवळीची नांदी ठरला. २००० पेक्षा अधिक उपवर मुला-मुलींची नोंदणी या ठिकाणी करण्यात आली तर कार्यक्रमाचे आयोजक सुनील जवंजाळ पाटील यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दिनांक २ एप्रिल रोजी गर्दे सभागृहात मराठा वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सुनील जवंजाळ पाटील, सुनील सपकाळ, सुरेखाताई सावळे, संजीवनी शेळके, प्रा. जगदेवराव बाहेकर, पत्रकार गणेश निकम, अरविंद देशमुख, सुरेश देवकर, शिवाजी तायडे, डॉक्टर मनोहर तुपकर, डॉ.पराड, डॉक्टर अशोक खरात यांच्यासह असंख्य समाज बांधवांनी जय्यत नियोजन केले. सकाळी मेळाव्यास सुरुवात झाली. मेळाव्याचे जिजाऊंच्या लेकींनी तसेच जवंजाळ पाटील यांनी उद्घाटन केले. यावेळी जिजाऊ वंदना घेण्यात आली. प्रास्ताविक सुनील जंवजाळ यांनी केले. ते म्हणाले – लग्न जुळवणे सध्या अवघड काम झाले आहे. त्यात लग्नात येणारा खर्च हा वर बापासाठी अडचणीचा विषय ठेवतो. अशावेळी मराठा बांधवांनी सर्व पोटभेद विसरून एका छताखाली येणे काळाची गरज असल्याचे जवंजाळ म्हणाले. तर आमदार श्वेताताई महाले यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावून सामाजिक उपक्रमासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. आतापर्यंत राज्यात ३३ ठिकाणी मेळावे घेण्यात आले. तर बुलढाणा येथील हा ३४ वा मेळावा उत्स्फूर्त पार पडला.
शिस्तबद्ध नियोजन
मेळाव्याच्या ठिकाणी चौकशी कक्ष, नोंदणी कक्ष, देखरेख समिती, भोजन समिती, माहिती तंत्रज्ञान समिती आदी समित्यांच्या माध्यमातून कार्यक्रमास सुटसुटीतपणा आला होता. नोंदणी करणारे उपवर त्यांचे नातेवाईक, पालक यामुळे या ठिकाणी गर्दीने उच्चांक मोडला. राज्यात ठीक ठिकाणी मेळावे झाले असले तरी बुलढाणा येथील मेळावा लक्ष्यवेधी ठरला. कार्यक्रमास गौरीताई शिंगणे, डॉक्टर पर्हाड, नारायणराव मिसाळ, राजेश गायकवाड, सुभाष गवळी, डॉक्टर चिंचोले, राहुल सावळे, दिनकर चिंचोले, श्रीकृष्ण जेऊघाले, भगवान कानडे, प्रतिभा भुतेकर, विक्रम घुले, ज्योती पाटील, तेजराव सावळे, शेवाळे मामा, मीनल आंबेकर, अण्णा म्हळसणे, प्रा.बोडके, पत्रकार राजेंद्र काळे, साहित्यिक सदानंद देशमुख यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते.
समाजभूषण देऊन सत्कार
मेळाव्याच्या माध्यमातून सुनील जवंजाळ पाटील यांनी लोकचळवळ उभी केली. राज्यभर ठिकठिकाणी मेळावे घेऊन त्यांनी समाजाला दिशा दिली. याबद्दल समाज बांधवांनी पाटील यांना मराठा समाज भूषण देऊन कौटुंबिक गौरव केला. तसेच जिल्हा समनव्यक म्हणून सुनील सपकाळ यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. बहारदार संचालक प्रा. अनिल रिंढे, संजिवनी शेळके, नवनीता चव्हाण यांनी केले.
—————-