लाडजळगाव तेथे लाडक्या लेकीचे वाजत गाजत स्वागत; परदेशी कुटुंबाचा उपक्रम!
शेवगाव, जि.नगर (बाळासाहेब खेडकर) – समाजात मुलीचा जन्मदर कमी झाल्याने समाजात अनेकाचे विवाह रखडले आहेत. मुलीचा जन्मदर वाढण्यासाठी शासन विविध उपाययोजना हाती घेत असताना, शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील परदेशी कुटुंबाने मुलीचे वाजगाजत, फटाक्याच्या आतषबाजी करत घरात भव्य स्वागत करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे परिसरात एक चर्चचा विषय बनला. अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत करून परदेशी कुटुंबाचे अभिनंदन केले.
आज समाजात मुलीचा जन्म खर्चिक व डोईजड ओझे असा समाजात गैरसमज होऊन दिवसेनदिवस मुलीचा जन्मदर कमी झाला. त्याचा सर्वच समाजात फटका बसला जात आहे. शासनाने मुलीचा जन्म दर वाढण्यासाठी विविध उपक्रांद्वारे समाज जागृती करण्याचे काम हाती घेतले जात असतानाच, शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील माजी सरपंच व बांधकाम व्यवसायिक विकास परदेशी यांना विवाहित दोन मुलं, मुली, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या घरात बरेच दिवस कन्यारत्न नव्हते पण त्याचा मुलगा वैभव विकास परदेशी यांचा विवाह जयश्री शिवलाल मारवाळ रा. सेलू जि. परभणी यांच्याशी झाला. जयश्री वैभव परदेशी यांना शिवजयंती व महाशिवरात्रीच्या दिवशी दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी अनेक वर्षानंतर परदेशी कुटुंबात कन्यारत्न प्राप्त झाल्याने कुटुंबात एकच आनंद झाला. त्यांचा आनंद गगनात भिडला गेला व लाडक्या कुमारी रुद्रमा वैभव परदेशी या कन्येचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सायंकाळीं लाडजळगाव येथे परदेशी कुटुंबाने घरासमोर रांगोळी, बरोबर पाने फुलांनी भव्य सजावट करून फटाक्याच्या आतषबाजी करत, कुमारी रुद्रचाचे औक्षण करून भव्यदिव्य स्वागत करून आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येऊन स्वागत केले. या परदेशी कुटुंबाने मुलीचे स्वागत करून हा उपक्रम राबवून समाजापुढे एक दिशा देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांना अनेकानी उपक्रमाचे स्वागत करून अभिनंदन केले. या कार्यक्रमास कुटुंबासह असंख्य ग्रामस्थ महिला बालक उपस्थित होते तर हाती घेतलेल्या या आदर्श उपक्रमाबाबत परिसरात कौतुक होऊन एक चर्चचा विषय बनला आहे
आमच्या कुटुंबात अनेक दिवस कन्यारत्न नसल्याने मुलीबाबत जिव्हाळा प्रेम आपुलकी होती, पण रुद्राईच्या रूपाने कुटुंबात मुलीचे आगमन झाल्याने मोठा आनंद झाला. त्यामुळे कुटुंबासह ग्रामस्थांनी भव्य स्वागत केले.
– विकास परदेशी, मुलीचे आजोबा
—————–