BULDHANAChikhaliHead linesVidharbha

‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या बातमीचा दणका; अन्नपदार्थाच्या ढिगार्‍यांची अखेर लावली विल्हेवाट!

– चिखली नगरपालिकेचे माणसं ट्रॅक्टरसह फावडे, टोपले घेऊन क्रीडा संकुलाच्या मैदानावर पाेहोचले, तासाभरात झाली स्वच्छता!

चिखली/ बुलढाणा (संजय निकाळजे) – चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भोजनाच्या कार्यक्रमातील बरेचसे अन्न वाया गेले, व त्याचे ढीग क्रीडा संकुल मैदानावर तसेच पडून होते. हा प्रकार मंगळवारी, दि. २८ मार्च रोजी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ प्रतिनिधींच्या नजरेस आला. त्यामुळे त्यांनी सायंकाळी चार ते पाच वाजेदरम्यान आपल्या कॅमेरात कैद केला. या कॅमेरात अस्ताव्यस्त पडलेले पोळी, भात, भाजी त्यांचे ढीग कॅमेर्‍यात कैद केल्यानंतर ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने या संदर्भातचे प्रखड वृत्त राज्यस्तरावर प्रसारित केले होते. या बातमीची तात्काळ दखल घेऊन आज बुधवार, दि. २९ मार्च रोजी सकाळीच नगरपरिषदेचे ट्रॅक्टरसह माणसं फावडे, टोपली घेऊन क्रीडा संकुल मैदानावर आले व पदार्थाचे ढीग ट्रॅक्टरमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

सोमवार, २७ मार्च रोजी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त मतदारसंघामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले होते. तर चिखली येथील क्रीडा संकुल मैदानावर ‘डे नाईट’ आमदार चषक क्रिकेट मॅचचेदेखील आयोजन केले होते. चिखली विधानसभा मतदारसंघातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांचा वाढदिवसानिमित्त अपघात विमा काढण्यात आला. त्यामुळे त्या धनादेश वितरणाचा कार्यक्रम आणि मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकासह, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांच्यासाठी जेवणाचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. एकीकडे आमदार श्वेताताईंचा सत्कार सोहळा सुरू होता तर बाजूलाच समोर जेवणाची व्यवस्था केलेली होती. मात्र याच बनवलेल्या अन्नपदार्थातील काही पदार्थ उरल्यामुळे त्याची विल्हेवाट न लावता दुसर्‍या दिवशी म्हणजे, मंगळवार, २८ मार्चच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोळी, भात, भाजी यांचे ढीग क्रीडा संकुल मैदानाच्या आवारामध्ये पडून होते.

शेकडो माणसांच्या पंगती उठतील इतके अन्न वाया गेले होते. तर मैदानावर प्लास्टिक ग्लास विखुरलेले होते. त्यावर ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या कॅमेर्‍याची नजर पडली व ते सर्व पदार्थ कैद केले होते. क्रीडा संकुल मैदानावर पडलेल्या अन्नपदार्थाच्या ढिगार्‍यामुळे व इतर पदार्थामुळे शेजारीच असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे समोरील रोडवर असलेल्या दुकानदार व गिर्‍हाईक आणि क्रीडा संकुल मैदानावर फिरण्यासाठी किंवा व्यायामासाठी येणार्‍यांना त्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला असता. मात्र संबंधितांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या बातमीची तात्काळ दखल घेतली आणि बुधवार, २९ मार्च रोजी सकाळीच नगरपरिषदेचे ट्रॅक्टरसह फावडे, टोपले घेऊन माणसांनी ते ट्रॅक्टरमध्ये भरले व त्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे पुढील होणारा त्रास वाचला, एवढे मात्र निश्चित..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!