– स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनापुढे नरमले एसबीआय बँक प्रशासन
बिबी/लोणार (ऋषी दंदाले) – भारतीय स्टेट बँक शाखा लोणारच्यावतीने काही वर्षा अगोदर पीककर्ज घेतलेल्या शेतकर्यांच्या खात्याला पीक कर्जाचे रिन्यूअल न केल्यास होल्ड लावण्याचा प्रकार सुरू होता. त्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी २३ मार्चला लेखी निवेदनाद्वारे शेतकर्यांच्या खात्याचे होल्ड २८ मार्चपर्यंत काढण्याची मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास बँकेसमोर बेमुदत ठीय्या आंदलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या आंदोलनाच्या धसक्याने बँक प्रशासनाने शेतकर्यांच्या खात्याचे होल्ड काढण्याचे लेखी पत्र सहदेव लाड यांना दिले आहे.
भारतीय स्टेट बँक शाखा लोणारच्यावतीने पीक कर्जाचे रिन्यूअल न करणार्या शेतकर्यांच्या खात्याला होल्ड लावण्यात आलेले होते. त्यामुळे शेतकरी पीएम किसान योजनेचे पैसे असतील किंवा इतर काही अनुदानाचे पैसे हे शेतकरी काढू शकत नव्हते. त्यामुळे शेतकर्यांचे सर्वच व्यवहार बँकेच्या वतीने बंद करण्यात आले होते. तरी परिसरातील शेतकर्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या सोबत संपर्क साधल्यावर सहदेव लाड यांनी तहसीलदार लोणार व शाखा अधिकारी भारतीय स्टेट बँक लोणार यांना निवेदन देऊन २८ तारखेपर्यंत शेतकर्यांचा खात्याचे होल्ड न निघाल्यास बँकेसमोर बेमुदत ठीय्या आंदोलन करण्यात इशारा दिला होता.
सहदेव लाड यांच्या आंदोलनाच्या धसक्याने भारतीय स्टेट बँक शाखा लोणारच्या वतीने शेतकर्यांच्या खात्याचे होल्ड काढण्याचे लेखी पत्र सहदेव लाड यांना देण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलन होण्याआधीच मागणी पूर्ण झाली आहे, यावेळी उपस्थित संदीप सरकटे, माधव सोनुने, अशोक तारे, विजय फोलाने, विशाल शीलवंत, राजु फोलाने, विजय सोनुने व आदी शेतकरी उपस्थित होते.
———————–