बुलढाणा (खास प्रतिनिधी) – हळूहळू आग रौद्ररूप धारण करीत होती.. गोठ्यात बांधलेल्या जनावरांचा सुटकेसाठी आकांत चालला होता. मात्र दुर्दैवी घटना घडलीच! गोट्यासह ८ जनावरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने त्यांच्यासह कृषी साहित्य बेचिराख झाले. ही घटना बुलढाणा तालुक्यातील इरला गावात घडली. शेतकरी भागवत सरोदे यांची अंदाजीत ९ ते १० लाख रुपये पर्यंतचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या शेतकरी,पशुपालकांवर अनेक संकटे आक्रमण करीत आहे. पशुधन वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मात्र आसमानी व सुलतानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. दरम्यान बुलढाणा तालुक्यातील इरला येथे काल रात्रीच्या सुमारास घडलीय. शेतातील गोठ्याला आग लागल्याने या आगीमध्ये ८ जनावरांचा जळून कोळसा झाला. शेतकरी भागवत सरोदे यांच्या शेतात जनावरे बांधण्यासाठी गोठा केला आहे. येथे जनावरे बांधून ठेवलेले असतात. शेतकरी सरोदे हे नेहमीप्रमाणे चारापाणी करुन गोठ्यामध्ये गुरे बांधलेली होती. तसेच या गोठ्यामध्ये त्यांनी शेतीपयोगी साहित्य देखील ठेवलेले होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास सरोदे यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागली. यामध्ये ८ जनावर आणि शेती साहित्य भस्मसात झाले.तसेच गोठ्यात ठेवलेले शेतीपयोगी साहित्य सुद्धा जळून खाक झाल्याने त्यांचे अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला असून शेतकरी भागवत सरोदे यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.