जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार!
– पक्षाकड़े अर्ज करण्याचे इच्छुकांना आवाहन
बुलढाणा (बाळू वानखेडे) – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) ही तीनही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील दहाही बाजार समित्यांच्या निवड़णुका एकत्र लढणार आहेत. याबाबत चिखली येथे २६ मार्चरोजी महाविकास आघाड़ीच्या नेत्यांची बैठक झाली असून, या बैठकीत एकीने लढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. इच्छुकांनी पक्षाकड़े उमेदवारीसाठी अर्ज करावे, असे आवाहनही करण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, मेहकर, बुलढाणा, चिखली, मलकापूर यांसह दहा बाजार समित्यांच्या निवड़णूका जाहीर झाल्या असून, काल २७ मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, सदर निवड़णकीबाबत २६ मार्च रोजी चिखली येथे माजी मंत्री आ. ड़ॉ. राजेन्द्र शिंगणे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, शिवसेना (ठाकरे) संपर्कप्रमुख नरेंद्र खेड़ेकर व संबंधित पक्षांचे जिल्हाध्यक्ष व मान्यवर नेते आदिंची बैठक पार पड़ली. यावेळी दहाही बाजार समित्यांच्या निवड़णुका एकत्र लढण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात येवून बाजार समित्यांवर महाविकास आघाड़ीचा झेंड़ा फड़कविण्याचा निर्धारही करण्यात आला.
महाविकास आघाडी एकत्र निवड़णूक लढवणार असल्याने इच्छुकांनी संबंधित तालुकाध्यक्षांकड़े अर्ज द्यावेत, कोणीही परस्पर अर्ज दाखल करून नये, कारण महाविकास आघाड़ीचे उमेदवार एकत्रित अर्ज दाखल करणार आहेत, असेही बैठकीत ठरले. तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनी ३० मार्च तर काँग्रेसच्या इच्छुकांनी २९ मार्चपर्यंत संबंधित तालुकाध्यक्षांकड़े उमेदवारी अर्ज द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसटे जिल्हाध्यक्ष अॅड़. नाझेर काझी व काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केले आहे.
रविकांत तुपकरांची भूमिका काय?
बाजार समित्यांच्या निवडणुकांत शेतकरी नेते तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची भूमिका काय? असा प्रश्न सद्या निर्माण झालेला आहे. तुपकर हे महाविकास आघाडीत सामील होणार की, स्वतंत्र उमेदवार देणार? याबाबत चर्चा होत आहे. बाजार समित्यांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीविरूद्ध भाजप-शिंदे गट अशी लढत रंगण्याची चिन्ह आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना उतरली तर मात्र तिहेरी लढतीचे संकेत प्राप्त होत आहे. दरम्यान, तुपकरांशी महाविकास आघाडीचे नेते चर्चा करत असल्याची माहिती हाती आली आहे.
——————