BULDHANAVidharbha

प्राचार्य डॉ. गोकुल डामरे यांना अमेरिकेची डीलिट पदवी

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – संत नगरी शेगाव येथील उत्तमराव देशमुख शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोकुल श्यामराव डामरे यांना नुकतीच युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका या विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय संशोधनाच्या संदर्भात, ‘समूह शिक्षण : शैक्षणिक गुणवत्ता काळाची गरज’ या विषयावर संशोधन केल्याबद्दल तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल मानद डीलिट ही पदवी प्रदान केली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

डॉ.गोकुल डामरे यांची भारताच्या डॉ. राधाकृष्ण टीचर्स वेल्फेअर असोसिएशनने शिफारस केल्यावर अमेरिकन विद्यापीठाला त्यांच्या योगदानाचा अभिमान वाटल्यामुळे ही पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली आहे. डॉ.गोकुल डामरे हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र आंतरविद्याशाखा अभ्यास मंडळाचे सदस्य असून, त्यांचे आजपर्यंत ५५ आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर आणि १० शैक्षणिक संशोधन आणि शिक्षणशास्त्रावरील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. डॉ. गोकुल डामरे हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विषयाचे पीएचडीचे मान्यता प्राप्त मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी पीएचडी संशोधानाचे कार्य करत आहेत. त्यांच्या या उज्वल यशाबद्दल त्यांचे शिक्षण क्षेत्रात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!