अमडापुरात हिरकणी महिला अर्बनच्या 17 व्या शाखेचा शानदार प्रारंभ
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – ब्राम्हणवाडा जल प्रकल्पामुळे अमडापुर परीसरात जलसंवर्धनातून झालेल्या हरितक्रांतीमुळे बहुतांश ठिकाणी भीषण पाणीटंचाईवर मात झाल्याने परीसर सुजलाम सुफलाम झाला आहे. सिंचनाचा अनुशेष भरून निघाल्यामुळे विविध बॅंकांनी अमडापुर कडे लक्ष केंद्रीत केले. ही आनंदाची बाब आहे तर आर्थिक प्रगती साधण्याकरीता आज शुभारंभ होत असलेल्या हिरकणी महिला बॅंकेच्या अमडापूर येथील नूतन शाखेच्या माध्यमातुन आर्थीक प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांनी केले. ते अमडापूर येथील हिकरणी महिला अर्बन बॅंकेच्या 17 व्या शाखेचे उद्घाटक म्हणुन बोलत होते. यावेळी अनुराधा अर्बनचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, हिरकणी महिला अर्बनच्या अध्यक्षा सोै. वृषालीताई बोंद्रे, महाबीजचे संचालक वल्भराव देशमुख, गफार पटेल आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या दहा वर्षाच्या अल्पावधीत स्थापन झालेल्या हिरकणी महिला अर्बन बॅंकेने जिल्हयातील सहकार क्षेत्रात शाखांचे जाळे पसरवित आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. आज हिकरणी महिला अर्बन बॅंकेच्या अमडापुर येथील 17 व्या शाखेचे उद्घाटन माजी मंत्री भारतभाउ बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणुन बोलतांना माजी मंत्री भारतभाउ बोंद्रे म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळात खडकपुर्णा, पेनटाकळी, ब्राम्हणवाडा, करडी, मासरूळ, पदमावती, इत्यादी प्रकल्पाच्या उभारणीतुन जलसंवर्धनातुन जिल्हयातील सिंचनाचा अनुशेष भरून काढल्या गेला. प्रकल्प उभारणीतुन पाणी टंचाईवर मात करीत हरितक्रांती झाली आता बॅंका आपल्या परीसरात येत आहे. याचा फायदा परीसरातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांनी घ्यावा. हिरकणी महिला अर्बनच्या अमडापुर शाखेमुळे परीसरात आर्थीक प्रगती साधण्याकरीता मार्ग मोकळा होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले.
राहुलभाऊ म्हणाले… हजारो तरुणांना रोजगार!
या वेळी बोलतांना माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे म्हणाले की, कर्मयोगी स्व. तात्यासाहेबांनी सुरू केलेल्या सर्वच शैक्षणीक, सहकार, आर्थीक व औद्योगिक संस्था सुस्थितीत प्रगती पथावर असुन उत्कृष्टरीत्या कार्यरत आहेत. माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांनी जनकल्याणास्तव पाणी आडविण्याची क्रांतीकारी कृती केली, त्याचा फायदा भविष्यात येणा-या पिढयांना होणार आहे. ते पुढे म्हणाले हिरकणी महिला अर्बनच्या 17 व्या शाखेचा अमडापुर सारख्या ग्रामीण परीसराचे नेतृत्व करणा-या ठिकाणी शुभारंभ होत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे. मोबाईल बॅंकींग क्षेत्रा विदर्भातील हिरकणी ही विदर्भातील पहिली बँक असुन ऑडीट अ वर्ग तर थकीत 5 टक्के आहे. ग्राहक, कर्जदार, भागभांडवल धारकांच्या विश्वासावर बँकेच्या 150 कोटी रूपयांच्या ठेवी असुन 17 शाखा कार्यरत, 3 शाखा प्रगती पथावर व 3 शाखा प्रस्तावीत आहेत. येत्या काळात 80 कोटीचं लक्ष बँकेने ठरविले असून, परीसरातील 150 हुन अधिक सुशिक्षित तरूणांना रोजगार उपलब्धी होणार आहे.