Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

काँग्रेसनेते डॉ. अरविंद कोलते यांची वीजचोरी उघडकीस, तब्बल साडेदहा लाखांचा दंड

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – मलकापूर येथील काँग्रेस नेते डॉ. अरविंद कोलते यांच्या घरावर महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकला असता, तब्बल १० लाख ४७ हजार रूपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. डॉ. कोलते हे त्यांच्या रुग्णालयात आणि घरात वीज चोरी करत असल्याचे उघडकीस आले असून, विद्युत मीटरमध्ये छेडछाड करुन तब्बल सव्वादोन वर्ष वीज चोरी सुरु होती, असे महावितरण अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी बुलढाणा विद्युत वितरणाच्या भरारी पथकाकडून १० लाख ४७ हजार ९२२ रुपयांचा दंड त्यांना ठोठावण्यात आला आहे.

डॉ. अरविंद कोलते यांच्या रुग्णालयात आणि घरात वीज चोरी होत असल्याची माहिती विद्युत वितरणला मिळाली होती. त्यानुसार बुलढाणा विद्युत वितरणाच्या भरारी पथकाने या काँग्रेस नेत्याच्या रुग्णालय आणि घरात असलेल्या विद्युत मीटरची तपासणी केली असता विद्युत मीटरमध्ये छेडछाड केल्याचे उघडकीस आले. यावेळी मीटरची तपासणी करुन गेल्या सव्वा दोन वर्षात तब्बल ६० हजार ९७८ युनिटची चोरी झाल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे भरारी पथकाकडून या काँग्रेसच्या नेत्याला १० लाख ४७ हजार ९२२ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. कारवाई दरम्यान भरारी पथकाने या काँग्रेस नेत्याच्या रुग्णालय आणि घरात लावलेले विद्युत मीटर जप्त केले आहे. विद्युत वितरणाच्या भरारी पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे मलकापूरमध्ये एकच खळबळ उडाली होती.


काँग्रेस नेते डॉ. कोलते यांनी तीन टर्म मलकापूर विधानसभेमध्ये निवडणूक लढवलेली आहे. एकदा अपक्ष तर दोनदा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर ते लढले होते. नुकतेच निवडणूक लागण्याच्याआधी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डॉ. अरविंद कोलते हे मुख्य प्रशासक म्हणून कारभार पाहत होते.
————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!