BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

अल्टो कार व स्कार्पियो गाडीच्या भीषण अपघातात १० वर्षीय बालकाचा मृत्यू; ५ गंभीर

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – मारोती अल्टो कार व स्कार्पियो वाहनामध्ये रविवार, २६ मार्च रोजी दुपारी मेहकर-जालना रोडवरील चिंचोली बोरे फाट्यावर भीषण अपघात झाला. या अपघातात अल्टोमध्ये बसलेल्या १० वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाले. श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी ते शेगावला निघाले होते.

लोणार येथील रहिवासी गजानन निखाडे आपल्या कुटुंबियासह एमएच ४६ डब्ल्यु ३८३३ क्रमांकाच्या मारोती अल्टो कारने संतश्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघाले होते. घरून निघून अर्धातास होत नाही तोचं काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांची गाडी मेहकर-जालना मार्गावरील चिंचोली बोरे फाटयावर पोहचताचं नागपूरकडून येत असलेल्या स्कार्पियो क्रमांक एमएच ४६ एन ४५३४ ने अल्टोला धडक दिली. या अपघातात अल्टोमधील आर्यन गजानन निखाडे वय १० वर्ष याचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. या घटनेत आर्यनची आई सविता गजानन निखाडे ३५ वर्ष, आर्यनचा जुळाभाऊ अंश गजानन निखाडे १०, चालक अंकुश उध्दव अवचार ३१ व स्कार्पियोमधील सुयोग परसराम भुके व अक्षय डिगांबर रंगारी रा. नागपूर गंभीररित्या जखमी झाले. सर्व जखमींना मेहकर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, अधिक तपास मेहकर पोलीस निरिक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वसंत पवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!