बेंगळुरू (प्रतिनिधी) – कर्नाटकच्या दौर्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघडकीस आली आहे. पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था भेदून एक युवक पंतप्रधानांच्या धावत जात अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, सुरक्षा यंत्रणांनी या युवकाला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी सुरू होती. गेल्या दोन महिन्यातील पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीची ही दुसरी घटना आहे. बेंगळुरूनजीकच्या दावणगेरे येथील भाजपच्या विजय संकल्प यात्रेच्या रोड शोदरम्यान हा प्रकार घडला.
कर्नाटकातील दावणगेरे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो सुरू होता. रस्त्याच्या दुर्तफा लोकांची गर्दी होती आणि घोषणाबाजी सुरू होत्या. याचदरम्यान, एक तरुणाने सुरक्षाकवच भेदून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. सुरक्षाकवच भेदल्यामुळे अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहे.