BULDHANAChikhaliCrimeHead linesMEHAKARVidharbha

रेशनच्या तांदुळाचा काळाबाजार साखरखेर्डा पोलिसांकडून उघड!

सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – रेशनच्या तांदूळ व गहू यांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे उघडकीस येत आहे. साखरखेर्डा पोलिसांनी नुकताच मेहकर टी-पॉइंटवर नाकेबंदी केली असता, काळ्या बाजारात नेण्यात येणारा तब्बल सहा लाख ६० हजारांचा तांदूळ पकडला असून, आरोपीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

सविस्तर असे, की दिनांक २३ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान साखरखेर्डा पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मेहकर टी पॉईंट साखरखेर्डा येथे नाकाबंदी केली असता, एका पांढर्‍या कलरच्या बोलोरो पिक अपमध्ये पांढर्‍या पोतडीत २० क्विंटल तांदूळ आढळून आला. लगेच पोलिसांनी चौकशीसाठी साखरखेडा पोलीस स्टेशनमध्ये वाहन लावले. या तांदुळाबाबत टेम्पोच्या चालकाला विचारपूस केली असता, त्यांनी योग्य उत्तर दिली नाही. त्यामुळे तांदूळ पंचासक्षम जप्त करून मालाबाबत कोणत्याही पावत्या हजर न केल्याने याबाबत नेमका तांदूळ हा सार्वजनिक वितरण प्रणालीचा आहे का याची खातरजमा करण्यासाठी सदरचा अहवाल तपासणीसाठी सिंदखेडराजा तहसीलदार यांच्याकडे दि. २४ मार्च रोजी पाठवला. तपासणी झाल्यानंतर जप्त केलेला तांदूळ हा बेकायदेशीररित्या खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी सदर पिकअप बोलेरो वाहतूक करताना आढळून आली.

या संदर्भामध्ये दिनांक २५ मार्च रोजी पोलीस कॉन्स्टेबल नामदेव काळे यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून साखरखेर्डा पोलिसांनी २० क्विंटल पांढर्‍या कोतडीतील तांदूळ किंमत ६० हजार रुपये बेलोरो पिकअप क्रमांक एमएच २८ एबी ५४८० किंमत सहा लाख रुपये हा माल जप्त करून आरोपी अमोल तेजराव गवई (वय ३७) व इस्माईल शहा मंगल शहा (वय ५०) वर्ष दोघेही राहणार हिवरा आश्रम, तालुका मेहकर यांच्याविरुद्ध कलम ३,७,जीवनाशक वस्तू अधिनियम १९५५कलमानुसार कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी घटनास्थळाला साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नंदकिशोर काळे यांनीसुद्धा भेट दिली. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल निवृत्ती पोफळे हे करीत आहे. यावरून हे सिद्ध होते की रेशनचा माल काळ्या बाजारात खुल्या बाजारात विक्रीसाठी नेणारे मोठे रॅकेट सक्रिय असून, याचा खोलवर तपास करणे गरजेचे आहे. या कामगिरीमुळे निश्चितच साखरखेर्डा पोलीसाचे कौतूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!