ChikhaliVidharbha

शॉर्टसर्किटमुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांची अडीच एकरातील गव्हाची सुडी जळून खाक!

मेरा बुद्रूक (कैलास आंधळे) – चिखली तालुक्यातील मौजे चंदनपूर येथील गावालगत शेतशिवारातील मोतीसिंग नारायण इंगळे गट नंबर १५२ यांच्या मालकीतील अडीच एकरातील शेतातून गेलेल्या वीज वाहिनीत शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणगी पडून गव्हाच्या गंजीला आग लागली. यात संपूर्ण अडीच एकरातील गव्हाची गंजी जळून खाक झाली. यात शेतकर्‍याचे अंदाजे दीड लाख रुपये नुकसान झाले.

आगीची ही घटना चंदनपूर शिवारातील गट नंबर १५२ मध्ये दिनांक २५ मार्च २०२३ रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास घडली. मोतीसिंग नारायण इंगळे यांची अडीच एकर शेती असून, संपूर्ण शेतात गव्हाची लागवड केली होती. त्यांच्या शेतातून विद्युत वाहिनी गेली आहे, दरम्यान, शुक्रवार रात्री वीज वाहिनीत शॉर्ट सर्किट होऊन आगीची ठिणगी पडल्याने संपूर्ण गव्हाची सुडी खाक झाली. या सुडीतून त्यांना ४० ते ४५ पोती गहू होण्याची शक्यता होती.

सुडीवर टाकलेली तीन ताडपत्री अंदाजे किंमत ६ हजार रुपये, त्या सुडीजवळ असलेले पीयूसी पाईप २८ ते ३० अंदाजे किंमत १८ ते २० हजार रुपये. जळलेल्या ४० ते ४५ पोत्याची सुडी अंदाजे किंमत १ लाख १२ हजार रुपये असा अंदाजित किंमत १ लाख २६ हजार रुपये नुकसान झाले. त्यावेळी अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी गावातील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, माजी सरपंच व गावातील शंभरहून अधिक महिला पुरुष घटनास्थळी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!