AalandiPachhim Maharashtra

टीबीमुक्त भारत अभियनांतर्गत ४५० शिधाकिटचे मोफत वाटप

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील स्कोडा वोक्सवॅगन कंपनीच्या सहकार्याने खेड तालुक्यातील सर्व क्षयरूग्णांना निक्षय मित्र योजने अंतर्गत पोषण आहार रेशनिंग शिधा किटचे वाटप जागतिक क्षयरोग दिनाचे निमित्त औचित्य साधून करण्यात आले. खेड तालुक्यात विविध ठिकाणी जागतिक क्षयरोग दिन जनजागृती, तपासणी, उपचारातून साजरा करण्यात आला.

या उपक्रमात घोषवाक्य राहिले ते ( Yas We can end TB! ) सर्वांनी एक दिलाने एकजुटीने काम केले तर, होय ! आपण क्षयरोग संपवू शकतो ! याप्रसंगी क्षयरोग पथक खेड येथे जागतिक क्षयरोग दिना निमित्त स्कोडा वोक्सवॅगन ऑटो इंडिया प्रा.ली. यांच्या वतीने क्षय रुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी स्कोडा वोक्सवॅगन ऑटो इंडिया प्रा.ली.एच आर हेड रामहरी कुटे, एनव्हायरोन्मेन्ट हेड संजय खरे, खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे , वैद्यकिय अधिक्षक डॉ. महेंद्र गरड यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी खेड तालुक्यातील सुमारे ४५० क्षय रूग्णांना पोषण आहाराचे वाटप ग्रामीण रुग्णालय चांडोली, ग्रामीण रुग्णालय चाकण, प्रा. आ. केंद्र शेलपिंपळगाव या तीन ठिकाणी करण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ इंदिरा पारखे यांनी सांगितले. जागतिक क्षय रोग दिनीं खेड तालुक्यात आरोग्य दायी किराणा सामान, गोडेतेल असे रेशनिंगचे शिधा किट वाटप उत्साहात करण्यात आले. यात रीन किलो तांदूळ, एक किलो शेंगदाणे, दिड किलो डाळ, अर्धा किलो खाद्य तेल या साहित्याचा आरोग्य पोषण आहार किट मध्ये समावेश होता. खेड तालुक्यातील क्षयरोग पथक, खेड आरोग्य विभाग, पंचायत समिती खेड आणि स्कोडा वोक्सवॅगन ऑटो इंडिया प्रा.ली. यांच्या वतीने प्रधान मंत्री टीबी मुक्त भारत अभियनांतर्गत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षय रुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.

जागतिक क्षयरोग दिनी आळंदीत जनजागृती

येथील डॉ. डी. वाय.पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी पुणे, अंतर्गत आर. एच. टी. सी. आळंदी यांचे वतीने जागतिक क्षयरोग दिना निमित्त जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, विभाग प्रमुख डॉ. हेतल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी आर एच टी सीचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. श्यामकांत कुलकर्णी, डॉ. ऐश्र्वर्या, श्री जोसेफ चेरियन, डॉ. योगेश कवाने यांनी मनोगत व्यक्त करीत मार्गदर्शन जनजागृती केली. इंटर्न यांनी पथनाट्या द्वारे जनजागृती केली. यावेळी सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!