BULDHANAVidharbha

वंचित बहुजन आघाडीचे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण विभागाच्या वतीने सोमवार, २७ मार्च रोजी बुलढाणा येथे विविध विषयावर धरणे आंदोलनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडी चिखली तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक आजी-माजी सर्व पदाधिकारी, वंचित युवक आघाडी, वंचित महिला आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सर्कल प्रमुख कार्यकर्ते या सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हायचे आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सुरडकर, तालुकाध्यक्ष संजय धुरंधर, तालुका उपाध्यक्ष संजय जाधव, शिवाजी गाडे, शहराध्यक्ष बाळूभाऊ भिसे, प्रा.मगाडे, प्रा. प्रवीण खरात, तालुका सचिव जितेंद्र निकाळजे, महेंद्र हिवाळे, तालुका उपाध्यक्ष रमेश गवई, महासचिव सतीश पंडागळे, तालुका सघटकं दादाराव वाकोडे, तालुका उपाध्यक्ष संदीप अंभोरे, रघुनाथ गवई, राहुल गवई, सिद्धार्थ वानखडे, तालुका महासचिव राहुल पैठणे, संजू सुरडकर, तालुका उपाध्यक्ष सिद्धार्थ गवई, अक्षय जाधव, मनोहर चव्हाण, मनोहर घेवंदे, प्रदीप खंडारे, तालुका सदस्य प्रदीप वाकोडे, तालुका उपाध्यक्ष सागर अराख, ज्येष्ठ नेत्या मालताताई निकाळजे, जेष्ठ नेते अंबादास जाधव, वासुदेव वानखडे, गजानन धुरंधर, अर्जुन बोर्डे, हसन मामा चाऊस, शहर उपाध्यक्ष नाशिर भाई, राजू खंडारे शहर संघटक यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या आंदोलनात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन चिखली तालुका अध्यक्ष संजय धुरंदर, तालुका सचिव जितेंद्र निकाळजे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!