KARAJATPachhim Maharashtra

कर्जतमध्ये रोटरीने उभारलेल्या ऑक्सीजन पार्कचा वर्धापनदिन उत्साहात

कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत शहरातील छत्रपती नगर या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने उभारलेल्या ऑक्सीजन पार्कच्या पहिल्या वर्धापन दिनानिमत्त सर्व झाडांना फेटे बांधून आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी यांनी उभारलेल्या रोटरी ऑक्सीजन पार्कच्या पहिल्या वर्धापन दिनानिमत्ताने कर्जत तालुक्यात पर्यावरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रो. डॉ संदिप काळदाते, हे होते. या सन्मान सोहळा कार्यक्रमात कर्जत तालुक्यात पर्यावरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या थेरगाव, दुर्गाव, माळंगी, रवळगाव, बेनवडी, सिद्धटेक, चिंचोली आदी गावाचा विशेष सन्मान करण्यात आला. तर दादा पाटील महाविद्यालयाच्या एन सी सी विभागाचा ही सन्मान रोटरी ऑक्सीजन पार्कच्या सर्व वृक्षांना गेली वर्षभर पाणी दिल्याबद्दल नगरसेवक सतिश पाटील यांचा ही सत्कार केला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोजेक्टचे चेअरमन रो. विशाल मेहेत्रे यांनी केले. तर रोटरीचे अध्यक्ष रो. संदीप गदादे यांनी स्वागत केले. सन्मान झालेल्या व्यक्ती व संस्था पैकी अशोक जायभाय, महेश जगताप, भाऊसाहेब रानमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, नगर पंचायतच्या नगराध्यक्षा उषा राऊत, यांनी मनोगते व्यक्त केली. कर्जत शहरात सातत्याने विविध उपक्रम राबविनाऱ्या रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी व सर्व सामाजिक संघटनेचे सर्वांनीच कौतुक केले.

गट विकास अधिकारी रो. अमोल जाधव यांनी बोलताना तालुक्यातील अनेक गावात काम करणाऱ्याना प्रोत्साहन देण्याची गरज होती, अनेक गावात आता गावपण दिसू लागले आहे, असे तालुक्यात चळवळीची व झाडांची वाढण्यासाठी स्पर्धा लागली असल्याचे म्हटले,
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संदिप काळदाते यांनी बोलताना या ऑक्सिजन पार्कची संकल्पणा व महत्व विषद केले. तालुक्यात अनेक गावात वृक्षारोपन सुरू झाले असून यामुळे तालुक्याचे नाव राज्यात पोहचले आहे. या ऑक्सिजन पार्क मुळे परिसरातील लोकांसह शहराला विशेष लाभ होईल या झाडाभोवती पेव्हींग ब्लॉग टाकण्यात येणार असल्याचे म्हंटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चंद्रकांत राऊत यांनी केले. माझी वसुंधरा शपथ, जल शपथ यावेळी घेण्यात आली. शेवटी सचिव रो सचिन धांडे यांनी आभार मानले.


छत्रपती नगर येथील १६ गुंठे ओपन स्पेस मध्ये ३५०० देशी झाडे लावून हा ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आला असून यामध्ये वड, पिंपळ, करंज कांचन, लिंब, चिंच, उंबर, अर्जुन, आपटा आदीसह विविध झाडे यामध्ये असून घनवन प्रकल्प हा मियावाकी पद्धतीने बनविण्यात आला असून या भोवती पेव्हींग ब्लॉग टाकण्यात येणार आहेत.
– रो. विशाल मेहेत्रे, चेअरमन, रोटरी कर्जत, संचलित ऑक्सिजन पार्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!