बुलढाणा (बाळू वानखेड़े) – भारतीय बौद्ध महासभा व प्रबुध्द सामाजिक संस्था खामगावच्यावतीने खामगाव येथील संत तुकाराम महाराज सभागृहात राज्यस्तरीय बौद्ध धम्मीय उप-वर युवक युवती परीचय संमेलन ३० मार्चरोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या परिचय संमेलनाचे उदघाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्याहस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष दादाराव हेलोड़े हे राहणार आहेत. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई, राष्ट्रीय उपाध्यक्ष भीमराव कांबळे, राष्ट्रीय महासचिव शंकरराव ढेंगरे, वंचित बहुजन आघाडी पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक सोनोने, जिल्हाध्यक्ष एस. एस. वले, जिल्हा महासचिव बी. के. हिवराळे, ड़ॉ. सुरेश सिरसाट, संजय भालेराव, गौतम गवई आदिंची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय संघटक माजी प्राचार्य आनंद वानखडे कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक आहेत. संचलन ज्योती सदांशिव, नितीन सूर्यवंशी व जी. यू. गवई हे करणार आहेत. तरी याचा उप-वर युवक, युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
—————–