– मार्चएण्डींगची कामे मार्गी लावणार!
सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्हा परिषदेचे कामकाज आता शनिवारी आणि रविवारीदेखील सुरू राहणार आहे. हे कामकाज सुरू ठेवण्यामागे एकच उद्देश आहे तो म्हणजे मार्च महिन्यापूर्वी प्रलंबित कामाचा निपटारा व्हावा यासाठी जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली.
शासकीय निम शासकीय कर्मचार्यांना जुनी पेन्शन लागू करावी, यासाठी मागील आठ दिवस कर्मचारी संपामध्ये गेले होते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचा निधी मार्च महिन्यापूर्वी खर्च करावा तसेच प्रलंबित कामे तात्काळ व्हावी या उद्देशाने आता शनिवारी आणि रविवार देखील सोलापूर जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी आणि रविवारी जिल्हा परिषदेचे कामकाज बंद असते. यासाठी सर्व खाते प्रमुख, तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना तशा सूचना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेला मिळालेला निधी पूर्णपणे खर्च व्हावा या उद्देशाने सर्व विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आले आहेत. त्यासाठी नियोजन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे मार्च महिन्यापूर्वी जवळपास सर्व निधी जवळपास खर्च होईल. ३१ मार्चपर्यंत सन २१ २२ मधील जवळपास ४८ कोटी खर्च करायचे आहे. त्यातील काही निधी खर्ची पडला आहे. तर काही बिले सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दीड महिन्याच्या कार्यकाळात चांगले काम करता आले!
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे प्रशिक्षणासाठी मसुरी येथे गेले असता त्यांच्या ठिकाणी प्रभारी सीईओ म्हणून जिल्हा परिषदेच्या निधी खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. दीड महिन्याच्या या कार्यकाळात चांगले वाईट अनुभव आले. तरी त्यातून बोध घेत चांगले काम करता आले. स्वामी साहेब २५ तारखेला येतील परंतु तसा अद्याप निरोप देखील आला नाही.
– संदीप कोहिनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी