– ‘एलसीबी’ने केला ६ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – खामगाव येथे एक्टिवा गाडीचे डिक्कीतून ६ लाख रुपये चोरून नेल्याप्रकरणी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) कसून तपास करीत असताना, एलसीबीला आंतरराज्यातील दरोडा टाकणारी टोळीच गवसली. दरम्यान, तीन दरोडेखोर पकडण्यात यश आले असून, ७ दरोडेखोर पळून गेले आहे. अजय कुमार अशोक भाई तमचे (४२), जिग्नेश दिनेश घासी (४४), रितिक प्रवीण बाटुंगे (२३) राहणार कुबेर नगर अहमदाबाद (गुजरात) असे या पकडण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. दरोडेखोरांकडून ६ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शेगाव येथील आनंद सागर इथून एक किलोमीटर अंतरावर करण्यात आली.
खामगाव शहर येथे १६ मार्च रोजी गांधी चौक येथे एक्टिवा गाडीच्या डिक्कीतून ६ लाख रुपये उडविण्यात आले होते. याप्रकरणी खामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाच्या अनुषंगाने सि.सी.टी.व्ही. फुटेज घेतले असता दोन युनिकॉन व एक मोपेड मोटारसायकल वर ६ इसमानी फिर्यादीच्या गाडीचा एच.डी.एफ.सी. बँक खामगाव येथून पाठलाग करुन फिर्यादी हा मकवाना चाट सेंटर गांधी चौक, खामगांव येथे नाष्टा करण्यासाठी थांबला असता, पाठलाग करीत असलेल्या युनिकॉन व एक मोपेड मोटारसायकलवरील ६ इसमापैकी एक इसम खाली उतरुन मोपेड मोटार सायकलची डिक्की उघडून डिक्कतील ६ लाख रुपयाची बॅग घेवून पळून गेले. अशाच प्रकारची चोरी ही एक दिवस पहिले अकोला शहरात झाली होती. खामगाव शहरातील बॅग लिप्टींगची घटना पाहता अपर पोलीस अधीक्षक, खामगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी,खामगाव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा व पोलीस निरीक्षक खामगाव शहर यांनी तातडीने घटनास्थळास भेट देवुन सदर आरोपीचे सिसीटीव्ही वरुन मिळालेल्या फुटेजवरुन त्यांचा शोध घेण्याकरीता पथक तयार करुन तपास कामी रवाना केले. गुन्हयाची गोपनीय माहिती काढून व तांत्रीक विश्लेषण करून सदर आरोपीतांनी अकोला व खामगावं परीसरात दोन घटना घडल्याने सदरचे आरोपी हे खामगाव पासुन जवळच असलेल्या परीसरात थांबलेले असल्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज लावला. खामगांव व शेगांव परीसरातील सर्व बस स्थानक, रेल्वे स्टेशन, हॉटेल, लॉजेस चेक केल्या.१७ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील शोध पथक शेगांव शहरात पेट्रोलींग दरम्यान लॉजेस चेक करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, बाळापुर रोडवर आनंद सादर पासुन १ कि.मी. अंतरावर गुजरात पासींग असलेली एक लाल रंगाची तवेरा गाडी व एक काळया रंगाची युनिकॉन मोटार सायकल रस्त्याच्या बाजुला उभी असुन ९ ते १० इसम अंधारात लपलेले आहेत. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा येथील तपास पथक त्वरीत बाळापुर रोडने रवाना झाले.
आनंद सागर पासून अंदाजे एक किलोमीटर अतंरावर मिळालेल्या माहिती प्रमाणे एक तवेरा गाडी व एक मोटार सायकल अंधारात उभी दिसली व तेथे काही इसम उभे दिसले. म्हणून पोलीसांनी वाहन थांबवून त्यांच्याकडे जात असतांना अंधारात लपलेले आरोपी पोलीसांना पाहुण पळुन जावु लागले त्यांच्या पैकी अजयकुमार अशोकभाई तमंचे वय ४२वर्ष, जिगनेश दिनेश घासी वय ४४ वर्ष,रितीक प्रविण बाटुंगे वय २३ वर्ष सर्व रा. कुबेर नगर, अहमदाबाद (गुजरात) असे तिन आरोपीतांना जागेवर पकडले व ७ आरोपी हे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. मिळालेल्या तवेरा गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये मोटार सायकलवर डयुप्लीकेट नंबर प्लेट बनविण्याकरीता लागणारे रेडीयम स्टिकर, वाहनाचे लॉक तोडण्याकरीता लागणारे लोखंडी अनुकुचीदार टोक असलेले टि खब्, दोन धारदार चाकु, चार पेचकस, एक कैची, मिरची पावडर, नगदी ८५,८०० रुपये, एक लाल रंगाची तवेरा वाहन क्रमांक उव्-१-RA-६८८२ किंमती ५,००,०००/- रुपये, एक युनिकॉन मोटार सायकल क्रमांक श्प्-३०-ँझ्-४२१८ किंमती ८०,००० रुपये, एक मोबाईल किंमती १०,००० रुपये असा एकुण ६,७६,८१० रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपी हे अंधारामध्ये लपुन दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याने त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे अप न. १८३/२३ कलम ३९९, ४०२ भादविसह ४/२५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचेकडुन ६,७६,८१० रुपयेचा मुददेमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीताना विश्वासात घेवून सखोल विचारपुस केली असता खामगाव, अकोला व यवतमाळ येथे बॅग लिफ्टीग केली असल्याचे सांगितले असून, सीसीटीव्ही फुटेज नुसार खामगाव शहरात त्यांनी घातलेले कपडे, बुट, टोपी व गळयातील एक मास्क त्यांचेकडे मिळुन आलेले आहे. सदरची टोळी ही आणखी १०-१५ दिवस विदर्भाच्या परीसरात फिरुन अशाच प्रकरच्या चोर्या करण्याच्या तयारीत असतांनाच स्थानिक गुन्हे शाखा,बुलडाणाच्या पथकाने त्यांना वेळी पकडुन पुढील घटनांना आळा घातलेला आहे.
असे आहे कामगिरी पथक….
सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, एलसीबी प्रमुख अशोक लांडे, यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल जंजाळ, विलासकूमार सानप, गणेश किनगे, केदार फाळव्ाâे, अजिस परसुवाले, मधुकर रगड, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, वैभव मगर, विजय सोनुने, सुरेष भिसे यांनी पार पाडली.