चिखली ग्रामीण (प्रतिनिधी) – ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखलीच्यावतीने १० मार्च रोजी गजानन नगरमधील पंचशील बुध्द विहारामध्ये प्रथमच अनेक वर्षानंतर बौध्द वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी घेंवंदे यांनी ऋणानुबंध समाज विकास संस्थेचे कार्य कौतुास्पद असल्याचे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपदी फुले – आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष एस. एस. गवई, उद्घाटक प्रा. डॉ. राजू गवई, विशेष उपस्थितीत सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, मार्गदर्शक प्रा.डॉ. सुभाष राऊत, अभियंते एन.के. सरदार, तर प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे नेते अर्जुन बोर्डे, बोधाचार्य भारत साबळे, दैनिक देशोन्नतीचे ज्येष्ठ पत्रकार प्रताप मोरे, सुभाष पाखरे, सचिन मोरे हे होते.
या ऋणानुबंध समाज विकास संस्थेच्या कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्यासह अकोला, वाशिम, जालना, जळगाव येथील ११५ वधु-वर यांनी अधिकृत नोंदणी करुन आपला परिचय दिला. ऋणानुबंध समाज विकास संस्थेच्या माध्यमातून प्रशांत डोंगरदिवे व रुपाली डोंगरदिवे यांनी तुकाराम आश्रय वृध्दाश्रम सुरु करुन वृध्दांची अविरत सेवा करीत आहे. तसेच ऋणानुबंध बौध्द वधु-वर सूचक केंद्र उभारुन आज भव्यदिव्य असा वधु-वर परिचय मेळावा यशस्वी केला. यामुळे लग्नसंबंध तात्काळ जुळतील व याकामासाठी लागणारा वेळ व पैसा वाचेल, असे मेळाव्याचे आयोजन करुन शेकडो समाज बांधवांना एकत्रित करुन समाज सेवा करणे खरोखर संस्थेचे कार्य उल्लेखनीय सुरु आहे, असे गौरवोउद्गार सेवानिवृत्त ऊपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांनी काढले.
तर पालक सध्या मुला-मुलींचे विवाह जुळवण्यासाठी परेशान आहेत. सुयोग्य वधू व वर मिळत नाही. म्हणून आशाप्रकारचे परिचय मेळावे होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. राजु गवई यांनी उद्धाटनप्रसंगी केले. तर ऋणानुबंध संस्थेच्या सदैव संपर्कात राहू व लागेल ते सहकार्य करु, असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.एस. गवई यांनी मांडले. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशांत डोंगरदिवे, सूत्रसंचालक संजय निकाळजे, तर आभार प्रदर्शन रुपाली डोंगरदिवे यांनी केले. बौध्द वधु-वर परिचय मेळावा यशस्वीतेसाठी प्रितम मिसाळ, डॉ. रविंद्र अंभोरे, जयदेव मघाडे, संदिप वाकोडे, किरण वानखडे, संतोष जाधव, बाळू कासारे, पत्रकार संजय निकाळजे, पत्रकार मयूर मोरे, मीठ्ठु मनिष मोरे यांनी परिश्रम घेतले.
—————-