– जानेफळच्या नवीन ठाणेदारांसमोर कडवट आव्हान!
मेहकर (अनिल मंजुळकर) – जानेफळ पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण मानकर यांच्यापुढे अनेक आव्हाने उभे आहेत. रंगपंचमीच्या दिवशी कळंबेश्वर या गावात डोक्यात मारुण जखमीं केल्याची घटना घडली. तर देऊळगाव साकरशा येथेसुध्दा दारुला पैसे दिले नाही म्हणून चांगलाच राडा घडल्याने सदर प्रकरणे चांगलेच चर्चेत आले असून, दोन्ही गावे अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जातात.
रंगपंचमीच्या दिवशी सायंकाळी सात वाजेपासून गैरअर्जदार व त्यांच्यासोबत सुनील चांगाडे हे सर्वजण पार्टी करण्यासाठी निघून गेले. माझा भाऊ रात्री घरी आला नाही. असा विचार करत असतानाच गैरअर्जदार घरी येऊन तुमचा मुलगा सुनील चांगाडे हा गावातीलच डॉ. पंकज बोराडे यांच्या दवाखान्यात भरती केला आहे. तुम्ही लवकर भेटण्यासाठी जा व आम्ही भेटण्यासाठी गेलो असता डॉक्टरांनी सांगितले की, तुमच्या मुलाला डोक्यात गंभीर मार आहे व बेशुद्ध अवस्थेत होता. मेहकर येथील डॉ. देशमुख यांच्या दवाखान्यात भरती केले. त्यांनीसुध्दा लवकर छत्रपती संभाजीनगरला घेऊन जायचा सल्ला दिला. जानेफळ पोलीस ठाण्यात तक्रारसुध्दा दिली आहे. परंतु अजूनपर्यंत एकाही आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले नसल्याने मेहकर येथे पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.
जानेफळ पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले ठाणेदार प्रविण मानकर यांच्यापुढे कायदा व सुव्यवस्था राखण्याचा मोठा प्रश्न असून, ते आपले कर्तव्य चोख बजावण्यात कितपत यशस्वी होतात. ते पाहणे गरजेचे आहे. जानेफळ पोलीस स्टेशनअंतर्गत बरीच गावे आहेत. त्यामुळे रोज काहीतरी घटना घडत असतात. पोलीस स्टेशनमध्ये प्रकरण आले की काही पोलीस जवळचे लोकांना बोलावून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा तक्रार दाखल केली जात नाही. त्यामुळे जानेफळ परिसरातील जनतेला मेहकर उपविभागीय पोलिस अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी जावे लागते. त्यामुळे नवीन ठाणेदार प्रविण मानकर यांनी जातीने लक्ष घालून प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी जनतेची मागणी जोर धरत आहे.