ChikhaliVidharbha

मंगरूळ नवघरेमध्ये काँग्रेसला गळती; उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह युवकांचा भाजपात प्रवेश

- आ. श्वेताताई महालेंच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास!

चिखली (तालुका प्रतिनिधी) – सलग दुसर्‍यांदा चिखली विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात उतरलेल्या आ. श्वेताताई महाले यांच्या झंजावाती विकासकार्याचे फळ त्यांना मिळत असून, निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानादेखील भाजपमध्ये प्रवेश करण्याचा ओघ सुरुच असल्याचे चित्र दिसत आहे. दि.१५ ऑक्टोबररोजी आ. श्वेताताई महाले आपल्या जनआशीर्वाद दौर्‍यानिमित्त मंगरूळ नवघरे येथे गेल्या असता, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी ग्रामपंचायतचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच युवकांनी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश केला.

आ. श्वेताताई महाले यांच्या प्रचारार्थ आयोजित जनआशीर्वाद दौर्‍यामध्ये श्रीमती महाले यांनी दि. १५ नोव्हेंबररोजी बोरगाव काकडे, तेल्हारा, बोरगाव वसू, भोगावती, तांबळवाडी, वरखेड आणि मंगरूळ नवघरे या गावांना भेटी दिल्या. या प्रत्येक ठिकाणी श्वेताताई महाले यांचे गावकर्‍यांनी उत्स्फूर्त स्वागत करून आपला पाठिंबा व्यक्त केला. मंगरूळ नवघरे येथे झालेल्या जाहीर सभेत महिला व पुरुषांसह युवकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या सभेमध्ये स्थानिक ग्रामपंचायतीचे उपसरपंच बद्रीनाथ वाकडे यांच्या नेतृत्वात उपसरपंच रमेश येळवंडे तसेच किरण गायकवाड, गोपाल वाकडे, शाम नखोद, पवन अनाळकर, कडूबा नवघरे, राहुल नवघरे, योगेश मोरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शुभम डोके, श्याम जाधव, कृष्णा पवार, वैभव गुंजकर, ओम वाकडे, देवानंद हरणे, समाधान अंभोरे, निशांत येळवंडे, रवी दाळिंमकर, सचिन मगर, भारत येळवंडे, सुनील प्रकाळ, ज्ञानेश्वर काळे, नितीन शिंदे, माधव दांडेकर, अंकुश पठाडे, श्याम पवार, ज्ञानेश्वर सोळंकी, शेख नजीर, शंकर अंभोरे, उस्मान खान सुलतान खान, प्रवीण पठाडे, गणेश येळवंडे, पवन सुरोशे, राम अंभोरे, अभिजीत पठाडे, अमोल सावंत, माधव उगले, गोपाल धंदारे, अरुण मठारकर, राजू मठारकर, कृष्णा माने, माधव सोळंकी, श्याम अंभोरे, देविदास गायकवाड आणि गोपाल तोडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे आ. श्वेताताई महाले यांनी पक्षाचा रुमाल देऊन स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ, सुरेशआप्पा खबुतरे, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन मोरे यांच्यासह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीरिपा व रयत क्रांती संघटना या महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!