लोणार (बुलडाणा)- शहरातील धार रोडवरील दि खामगाव अर्बन बँकेच्या खाली असलेल्या अनिल बन्सीलाल अग्रवाल यांच्या न्यू सत्यम कापड केंद्र व साडी सेंटरला भीषण आग लागल्याने दुकानातील सर्व कपडा जळून खाक झाल्याने अंदाजे २० ते २५ लाख रुपयाचे नूकसान झाल्याची घटना २६ जूनच्या मध्यरात्री दरम्यान घडली.
सदर आग लागताच घटनेची माहिती शहरातील सामाजिक – राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांना माहीती पडताच घटनास्थळावर धाव घेऊन नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्याने आजूबाजूला असलेल्या दुकानाचे किरकोळ नुकसान झाले. घटनास्थळावर अग्निशमन दलाची गाडीला पाचारण करण्यात आले.व आगीवर नियंत्रण आणण्यात आले. परंतु तोपर्यत कापड वेंâद्रातील सर्व साहित्य व कपडा जळून खाक झाला होता. टँंकरधारक तानाजी मापारी व शहरातील टँंकरधारक यांनी पाणी पुरवाठा केला. अग्निशामक दलाची गाडी अग्निशामक केंद्रात न ठेवता ती पोलीस स्टेश्न प्रांगणात लावण्यात यावे, अशी मागणी शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी न.प,प्रशासनाकडे केली आहे.
यावेळी घटनास्थळावर आग आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन,न.प. प्रशासनाचे कर्मचारी उपस्थीत होते. तसेच सामाजीक कार्यकर्ते डॉ. खुशालराव मापारी, शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.बळीराम मापारी ,सामाजीक कार्यकर्ते साहेबराव पाटोळे,उपनराध्यक्ष बादशाखान, शिवसेना शहरप्रमुख पांडुरंगजी सरकटे, राँका डॉ.सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.विक्रात मापारी, इमरानखान, राहुल मापारी, युवासेचे तालुकाध्यक्ष गजानन मापारी, सुबोध संचेती, शिवप्रसाद मुंदडा, संतोष मापारी, महादा नरवाडे, अभी सरकटे, उबेदखान यांच्यसह नागरींक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.