DelhiPolitical News

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री?? मेहकर मतदार संघाला मंत्रीपद मिळण्याची शक्यता ?

दिल्ली(ब्रेकींग महाराष्ट्र) सध्या सर्वीकडे एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात केलेले बंड चर्चेचा विषय ठरला आहे. शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार असून 10 अपक्ष आमदारांचा त्यांना पाठींबा असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीतील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. शिंदे भाजपाच्या संपर्कात असल्याने महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना मोठा वेग आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तूळात सुरु आहे. भाजपनं सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे. मंत्रीपद न मिळालेल्या बुलडाणा जिल्हयातील मेहकर मतदार संघातील आ.डॉ.संजय रायमुलकर यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा आहे.

         देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार, हे जवळपास निश्चित झाल्याची बातमी आहे. यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी फडणवीस आज 28 जून रोजी दिल्लीला पोहोचले. दिल्लीतून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर भाजप आणि शिंदे गट सरकार स्थापनेचा दावा करणार असून त्याच्यासाठी भाजप व शिंदे गटामध्ये सत्ता स्थापनेचा फॉर्मुला निश्चीत झाल्याचे वृत्त नवभारत टाईम्सने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. त्यानुसार शिंदे गटाला १३ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता असून त्यापैकी ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रिपद असणार आहे. तसेच भाजपकडून २९ जणांना मंत्रिपदे मिळू शकतात. शिंदे गटातील उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे,. दादा भुसे, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, उदय सामंत, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, राजेंद्र पाटील यड्रावकर, बच्चू कडू, प्रकाश आबिटकर, संजय रायमुलकर, संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता आहे. गुवाहाटी मध्ये सध्या 9 मंत्री आहेत. मात्र बंडखोरी केल्यानं सगळ्यांचीच मंत्रिपदं काढून घेण्यात आली. ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेल्या सगळ्यांनाच पुढील सरकारमध्ये मंत्रिपदं मिळू शकतात. तसेच शिंदे गटाला ४ अतिरिक्त मंत्रिपदे मिळण्याची शक्यता वतर्विली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!