बुलढाणा (खास प्रतिनिधी) – पोलीस अधिकारी असो किंवा सरकारी अभियोक्ता उत्कृष्ट काम केले तर कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कामाची निश्चितच दखल घेतली जाते. त्यांचा उचित सन्मान केला जातो आणि खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्या कामाचं चीज झाल्याचं समाधान लाभते. त्यांचा सन्मान नव्याने काम करण्याची ऊर्जा देऊन जातो. हीच संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी पुढे ठेवून सरकारी अभियोक्ता पोलीस अधिकारी यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल येथील पोलीस मुख्यालयातील प्रभा हॉल मध्ये 16 मार्च रोजी सन्मान सोहळा आयोजित करून त्यांना आपल्या कामाची पावती दिली.
या सन्मान सोहळ्याला पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, सचिन कदम, विलास यामावार, गिरीश ताथोड, अशोक लांडे यांची उपस्थिती होती. पोलीस अधिक्षक सारंग आवाड यांचे हस्ते गेल्या दोन महिन्यात विशेष कामगिरी करणारे पो.स्टे. ज्यामध्ये अ-श्रेणी पो.स्टे. मधून पो.स्टे. शिवाजीनगर खामगांव ( प्रथम- दोषसिध्दी आणि C.C.T.N.S.), पो.स्टे. खामगांव शहर ( दोषसिध्दी व्दितीय), पो.स्टे. देऊळगांव राजा ( गुन्हे निर्गती प्रथम ), पो.स्टे. लोणार ( गुन्हे निर्गती व्दितीय),पो.स्टे. बुलढाणा शहर (C.C.T.N.S. व्दितीय) ब-श्रेणी पो.स्टे. मधून पो.स्टे. धामणगांव बढे (दोषसिध्दी-गुन्हे निर्गती C.C.T.N.S. प्रथम क्रमांक), पो.स्टे. पिंपळगांव राजा (दोषसिध्दी व्दितीय),पो.स्टे. साखरखेर्डा (गुन्हे निर्गती व्दितीय), पो.स्टे. MIDC मलकापूर (C.C.T.N.S.व्दितीय) यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच विशेष सरकारी वकील म्हणून फिर्यादी पक्ष-सरकारी पक्षाची बाजू न्यायालयामध्ये भक्कमपणे मांडणारे सरकारी अभियोक्ता ॲड. व्हि.एल. भटकर, बुलढाणा, ॲड.ए.एम. खत्री, बुलढाणा,ॲड. ए.ए. केसाळे, बुलढाणा,ॲड. शैलेश जोशी, मलकापूर,अब्दुल मतीन, खामगांव ॲड. श्रीमती राजश्री आळशी, खामगांव, ॲड. आर.डी. बावस्कर, खामगांव, ॲड.जे.ए.बोदडे, मेहकर यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
पोलिसांच्या कर्तव्याचा गौरव!
दरम्यान एमपीडीए प्रस्ताव संबंधाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अशोक लांडे, धाड पोलीस स्टेशन सपोनि मनिष गावंडे, चिखली पोलीस स्टेशन सपोनि. अमोल बारापात्रे, रायपूर पोलीस स्टेशन सपोनि राजवंत आठवले यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आरोपीस 20 वर्षे शिक्षा संबंधाने तपास अधिकारी सपोनि अमित वानखडे स्था.गु.शा. बुलढाणा, सपोनि प्रियंका गोरे पोस्टे. बुलढाणा शहर आणि कायदा व सुव्यवस्था या हेड खाली पोनि केशव वाघ पो.स्टे. सिंदखेडराजा, पोनि शांतीकुमार पाटील, खामगांव शहर त्यांचा देखील सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आरोपी अटक कारवाईत पोनि आनंद महाजन,पो.स्टे. एमआयडीसी मलकापूर, गुन्हे उघड कारवाईत पोनि अशोक लांडे स्थागुशा बुलढाणा, पाहिजे- फरार आरोपीतांचा शोध विशेष मोहिमत एपीआय विकास पाटील पो.स्टे.बोरोखडी पीएसआय सचिन कानडे स्था. गु.शा. बुलढाणा, पीएसआय संदिप सालवे पो.स्टे. जानेफळ, पीएसआय आशिष गंद्रे पो.स्टे. शेगांव शहर,पीएसआय पांडुरंग शिंदे पो.स्टे.अमडापूर विशेष कामगिरी मध्ये पीएसआय प्रिया उमाळे, पीएसआय संजय ठाकरे ए एच टी यू बुलढाणा तसेच सामाजिक कार्यामध्ये पोनि दिनेश झांबरे पो.स्टे. जळगांव जामोद आणि सदर कामी विशेष कामगिरी करणारे जिल्ह्यातील पोलीस अंमलदार यांचा प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला.