LONARVidharbha

दरेगाव येथे रविवारी शेतकरी नेते रविकांत तुपकरांची जाहीर सभा

बिबी (ऋषी दंदाले) – सिंदखेडराजा, लोणार, मेहकर तालुक्यातील शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर हे दरेगाव येथे शेतकरी संवाद जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केले आहे.

शेतकर्‍यांच्या कापूस, सोयाबीनच्या भावासाठी तसेच पीक विम्याच्या व अतिवृष्टीच्या मदतीसाठी तुरुंगामध्ये जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सत्कार करण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव येथे दिनांक १९ मार्च २०२३ रोज रविवारला संध्याकाळी ६ वाजता जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा दरेगाव येथे भव्य सत्कार व शेतकरी संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी या शेतकरी संवाद सभेला परिसरातील शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केले आहे.

यावर्षी सुरुवातीपासूनच अतिपावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोटच्या लेकराप्रमाणे शेतकर्‍यांनी जगवलेल्या पिकालासुद्धा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे योग्य भाव नाही व एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही सरकारच्या वतीने अद्यापही शेतकर्‍यांना अतिवृष्टीची मदत सुद्धा देण्यात आली नाही व शेतकर्‍यांनी भरलेला पिक विमा सुद्धा रविकांत तुपकर यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे मग ते जलसमाधी आंदोलन असो किंवा बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर झालेले आत्मदहन आंदोलन असो याच आंदोलनाच्या दणक्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांना पीक विम्याची मदत मिळाली आहे.

तसेच अद्यापही काही शेतकरी हे पीक विम्याच्या मदतीपासून वंचित आहेत तरी या सर्व पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांसाठी तुरुंगामध्ये जाणारे शेतकरी नेते माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांचे हात बळकट करण्यासाठी दरेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे अनावरण व शेतकर्‍यांसाठी तुरुंगामध्ये जाणार्‍या रविकांत तुपकर यांचा भव्य नागरी सत्कार व कापूस, सोयाबीनच्या भावासाठी अतिवृष्टीच्या मदतीसाठी उर्वरित शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शेतकरी संवाद सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी पंचक्रोशीतील समस्त शेतकरी बांधवांनी दरेगाव येथे दिनांक १९ मार्च २०२३ संध्याकाळी ६ वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!