स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरची सुनावणी लांबणीवर; आता दिली २१ मार्च तारीख!
बुलढाणा (संजय निकाळजे) – सर्वोच्च न्यायालयात होणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणीची तारीख पुन्हा लांबणीवर गेली आहे. मंगळवार, १४ मार्च रोजी ही सुनावणी होणार होती. मात्र ती झाली नाही व यासाठी आता २१ मार्च तारीख देण्यात आली आहे. यामुळे हे पाहता निवडणुका पावसाळ्यानंतर किंवा दिवाळीच्या कालावधीतच पार पडतील, अशी शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण आणि वार्ड रचनाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हरकत घेतली गेली. त्यामुळे या निवडणुका लांबल्या स्थानिक स्वराज्य संस्था बाबतच्या याची किंवा याआधी ७ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार होती. मात्र ती झाली नाही. त्यानंतर २१ मार्च ही तारीख देण्यात आली. हे प्रकरण लवकर ऐकून घेऊ, असे सरन्यायाधीश यांनी सांगितले. आणि पुन्हा १४ मार्च ही तारीख देण्यात आली. पण १४ मार्चला सुद्धा या याचिकेची नोंदही घेण्यात आली नाही. त्यामुळे २१ मार्च रोजी ही सुनावणी होऊ शकते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यापूर्वी कोरोनामुळे रखडल्या. त्यानंतर ओबीसींच्या आरक्षणामुळे घोळ केला. त्यात पुन्हा राज्यातल्या सत्तासंघर्ष उद्भवला. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पावसाळ्यात निवडणुका का घेत नाही? असा सवाल सरकारला केला होता. आता कोर्टातली सुनावणीच होत नसल्याने या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या २००६ च्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कालावधी जास्तीत जास्त सहा महिने लांबवता येतो. अर्थातच प्रशासक सहा महिन्यापेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. मात्र महाराष्ट्रात कोरोनानंतर निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेदेखील पालन होताना दिसत नाही. आता याचिकावरची सुनावणी पार पडल्याशिवाय हा मार्ग मोकळा होणे अशक्य आहे.