बुलढाणा (खास प्रतिनिधी) – तथागत भगवान गौतम बुध्दांनी शांतीचा संदेश अधोरेखित केला. त्यांच्या प्रेरक विचारांचा अभ्यास करण्यापेक्षा विचार आचरणात आणले पाहिजेत. आज मानवजातीमध्ये वैमनस्य व तेढ वाढत आहे. त्यामुळे जगाला युध्द नको तर बुध्द हवा असल्याचे विचार बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी इसोली या गावी व्यक्त केले.
तालुक्यातील ग्राम इसोली येथील नागसेन बुध्द विहार येथे तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या मूर्तीची स्थापना माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याहस्ते करण्यात आली. याप्रसंगी बौद्ध भिक्कु संघाचे पुज्ज भंते महानाम महाथेरो, शिलरत्न थेरो, महेंद्रबोधी थेरो, भंते बुध्दपुत्र तथा श्रामनेरसंघ यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधान सुपेकर, माजी न्यायाधीश सुरेष घोरपडे, संतोष गवई, भारतीय बोध्द महासंघाचे जिल्हा संघटक राजेंद्र गवई, विलास सरदार, बोैध्दाचार्य विजु गवई, कुंडलीक गवई, जनार्दन सरदार, सुनिल गवई, अनिल वानखेडे, संजय खरात, इंगोले सर, बाबुराव सोनुने, वसंतराव अवसरमोल, खपके साहेब, विजय गिते, विकास शेळके, कडुलाला, तुकाराम गायकवाड, अबुभाई, रविंद्र लेखणार, नारायण कानडे, श्याम गिते,संजय रसाळ तथा ग्रामस्थांसह बौध्द उपासक आणि उपासिका यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.