मोताळा (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील सिंदखेड गावकर्यांच्या एकीच्या बळामुळे या गावाने वॉटर कप स्पर्धेतील मानाचा फार्मर कप पटकावला आहे. पाणी फाऊंडेशनकडून वाटर कप स्पर्धेनंतर २०२१/२२ वर्षी प्रथमच घेण्यात आलेल्या फार्मर कप स्पर्धेचा निकाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पानी फाऊंडेशनचे संस्थापक तथा अभिनेते अमीर खान व किरण राव, एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी, स्पृहा जोशी, आशुतोष गोवारीकर, राज्याचे सचिव एकनाथ डवले, सह्याद्रीचे संचालक विलास शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थित बालेवाडी पुणे येथे नुकताच घोषित करण्यात आला.
पाणी फाउंडेशनने वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये लोकचळवळ उभी केली व मोठी जलसंधारणाची कामे उभी केलीत. पाणी मिळालेल्या गावांतील शेतकर्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मागीलवर्षी पाणी फाउंडेशनने फार्मर कप ही नवीन स्पर्धा सुरू केली. घेण्यात आलेल्या या स्पर्धेच्या निकालामध्ये मोताळा तालुक्याने भरीव कामगिरी करत शिंदखेड येथील स्त्रीशक्ती महिला गटाने तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार पटकावला, तर उबाळखेड येथील जय किसान शेतकरी गटाने द्वितीय पुरस्कार मिळवला. जनुना येथील कापूस उत्पादक शेतकरी गटाने तृतीय क्रमांक मिळवला. या तिन्ही गटांनी या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा सोप्या पद्धतीने वापर करून आपल्या उत्पादनात भरघोस वाढ केली आहे.
मागील २०१८ मधे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सिंदखेड गावाने राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक पटकाविला होता तर त्यानंतर गावाने जिल्हास्तरावरील स्मार्ट ग्राम पुरस्कार जिंकला, पुढे गावाने संत गाडगे बाबा आणि माझी वसुंधरा अभियान मध्येही चमकदार कामगिरी बजावली. तर आज पुन्हा स्रीशक्ती शेतकरी गट सिंदखेड यांनी तालुका स्तरावरील बक्षीस पटकावून आम्ही अजून पुढेही स्पर्धेत आहेत हेच नमूद केले. स्री शक्ती महिला शेतंकरी गटात रंजना राजेंद्र गडाख, जयाबाई रामधन शेळके, आशाबाई पुंडलिक सुरोसे, उषाबाई पदमाकर आलोने, चंदाबाई सातिश लवकर, उषाबाई सुभाष मोरे, लताबाई रमेश गड़ाख, सुभद्राबाई रघुनाथ आवटे, रेखाबाई श्रीकृष्ण थाते, शारदाबाई जयवंता नरवाडे, शोभाबाई विटल सुरोशे, निर्मलाबाई सुधाकर कापसे, जीजाबाई अशोक गड़ख, सविताबाई अरुण पवार, सिंधुबाई ज्ञानदेव गड़ाख़, सुनिताबाई शरद गड़ाख़, संतोषीबाई रामदास गवळी, अल्काबाई भागवत शिंदे आदी महिला असून, पूर्ण क्षमतेने काम करीत आहे.
पाणी फाऊंडेशनने दिलेले ट्रेनिंग आणि पाणी टीममधील नीलेश जाधव सर आणि ब्रह्मदेव गिर्हे सर यांचे मार्गदर्शन मिळाले. महिलांनी चिकाटीने केलेले काम व त्यातून त्यांना बक्षीस मिळाले असून, यांचे पूर्ण श्रेय स्री शक्ती गटाला तसेच परिवाराला जात आहे. या वर्षी ग्रामपंचायत पुन्हा पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत राहून यावर्षी राज्य स्तरावरील बक्षीस घेऊ, अशी या निमित्ताने ग्वाही देतो.
– आप्पा कदम, सरपंच सिंदखेड
—————-