Breaking newsBuldanaChikhaliVidharbha

अंढेरा गावाच्या पुलावरून गेले पुराचे पाणी

चिखली जिल्हा बुलडाणा : – गावालगतचा जीर्ण झालेल्या पुलाचे नवीन बांधकाम ठेकेदारा मार्फत सुरू करण्यात आले असल्याने लोकांना जाणे येणे करण्यासाठी पर्यायी रस्ता करुण दिलेला होता मात्र पहिल्याच पावसाचे पुराचे पाणी पुलावरून गेले त्यामुळे गावकऱ्यांना व शाळकरी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून पाण्यातून जावे लागले .तर वाहन धारकांना २० किलोमीटरचे हेलपाटे मारावे लागले . हा प्रकार अंढेरा गावालगत उघडकीस आला .

मेरा बु ते अंढेरा फाटा या रस्त्यावर मोठ्या लहान मोठ्या वाहनांची मोठया प्रमाणावर ये जा सुरू असल्याने रस्त्यावरील डांबरीकरण उघडून रस्त्याची चाळणी होवून गेली होती . त्यामुळे शिवसेना नेते सुभाष डोईफोडे यांनी रस्त्या दुरुस्ती साठी आंदोलनाचा इशारा दिला होता आणि दै देशोन्नतीने वारंवार बातम्या प्रकाशित करुण सार्वजनिक बांधकाम विभागाचे झोप उडविली , बातम्या प्रकाशित झाल्याने तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारा मार्फत चाळणी झालेल्या रस्त्यावरील पुलांची दुरुस्ती , नवीन पूल बांधकाम आणि डांबरीकरण केले . मात्र त्यामध्ये अंढेरा गावालगत असलेला जीर्ण झालेला पूल पूर्णपणे तोडून त्याठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी पर्यायी रस्ता ठेकेदाराने करुण दिला होता . परंतू पुलाची उंची कमी असल्याने पहिल्याच पावसाचे पुराचे पाणी पर्यायी रस्त्यावरून तसेच नवीन पुलावरून गेले त्यामुळे तीन ते चार तास पुलावरील पुराचे पाणी कमी झाले नसल्याने गावकऱ्यांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात टाकून पाण्यातून जाणे येणे करावे लागले . वाहन धारकांना तर २० ते २५ किलोमीटरचे हेलपाटे मारुण प्रवास करावा लागला .

नदीची पुराची क्षमता पाहूनच पुलांची उंची वाढविणे गरजेचे होते मात्र अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमत करुण पुलांची उंची कमी करुण बांधकाम पूर्ण केले त्यामुळे गावकऱ्यांना व शाळकरी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात टाकून रस्त्यावरुण प्रवास करावा लागत आहे. असे गावकऱ्यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!